what happens if a child has appendicitis, Appendix : मुलांच्या पोटदुखीला हलक्यात घेऊ नका, हे दुखणं अपेंडिक्सचं तर नाही ना? या लक्षणांना आवर्जुन ओळखा – kids abdominal pain could be a sign of appendicitis( प्रगत भारत । pragatbharat.com)

Appendicitis in Children : जर तुमच्या घरात मुले असतील तर तुम्हाला हे देखील माहित असेल की मुलांची तब्येत खूपच नाजूक असते. ती कधीही बिघडू शकते. अशावेळी तुम्हाला मुलांच्या तब्बेतीबाबत माहिती असणे आवश्यक आहे. हवामानात थोडासा बदल झाल्यानंतर मुलं लगेच आजारी पडतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान मुलांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असते आणि याच कारणामुळे त्यांना बालपणात अनेक प्रकारच्या संसर्गांना सामोरे जावे लागते.

लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसून येतात, परंतु काही वेळा मुलांचे आजार मोठे असतात. याबाबत पालकांना माहिती असणे आवश्यक आहे. अनेक वेळा बाहेरच्या गोष्टी खाल्ल्यानंतर किंवा संसर्गामुळे पोटाशी संबंधित आजारही होतात आणि त्यामुळे मुले पोटदुखीची तक्रार करतात. जर तुमच्या बाळाला खालच्या ओटीपोटात वेदना होत असेल तर ते हलके घेऊ नका. कारण त्या अपेंडिक्सच्या वेदना असू शकतात. जाणून घेऊया अपेंडिक्स म्हणजे काय आणि अपेंडिक्सच्या दुखण्याने मूल त्रासले आहे, तर काय करावे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​अपेंडिक्स म्हणजे काय?

सर्वप्रथम, तुम्हाला अपेंडिक्स म्हणजे नेमके काय आहे हे समजून घ्यावे लागेल. ते समजून घेतल्यावरच तुम्हाला मुलाची समस्या नीट समजू शकेल. अपेंडिक्स हा शरीराचाच एक भाग असला तरी, या अवयवाचे शरीरातील कार्य काय आहे याबाबत अद्याप स्पष्ट अशी माहिती समोर आलेली नाही. काही सिद्धांतांनुसार, अपेंडिक्स चांगल्या जीवाणूंनी बनलेले असते आणि ते अतिसाराच्या आजारांनंतर पचन पुन्हा सुरू करण्यास मदत करते.

​अपेंडिक्सचं दुखणं काय असतं?

बहुतेक लोक अपेंडिक्सला एक आजार मानतात, जरी तो एक अवयव आहे. अपेंडिक्समधील वेदनांना अपेंडिसाइटिस म्हणतात, जे बहुतेक प्रकरणांमध्ये संसर्गामुळे विकसित होते. जिवाणू, विषाणू किंवा कोणत्याही संसर्गामुळे जेव्हा अपेंडिक्समध्ये पू भरला जातो तेव्हा ते फुगते आणि वेदना होऊ लागते. अपेंडिसायटिस ही सहसा अपेंडिक्सची जळजळ असते आणि त्याला सामान्य भाषेत अपेंडिक्स म्हणतात.

(वाचा – मुलांना जंक फूडपासून चार हात दूर ठेवतील हे 5 उपाय, अवघ्या काही दिवसांतच अनहेल्दी सवय सुटेल)

​मुलांमध्ये अपेंडिक्सची समस्या

अपेंडिसायटिस ही लहान मुलांमध्ये देखील एक सामान्य समस्या आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय नाजूक असते. जेव्हा अपेंडिक्स आणि मोठ्या आतड्याला जोडणारी ट्यूब ब्लॉक होते, तेव्हा आत टाकाऊ पदार्थ साचल्यामुळे अपेंडिक्सला संसर्ग होतो किंवा सूज येते.

​मुलांमध्ये अपेंडिक्सची लक्षणे

मुलांमध्ये अपेंडिक्सशी संबंधित समस्या ओळखणे थोडे कठीण असते. कारण अनेकदा मुलांना वेदना नीट समजत नाहीत आणि त्यामुळे पालक आणि डॉक्टरांना या समस्येच्या मुळाशी जाता येत नाही. जर मुलामध्ये ओटीपोटात वेदना सोबत खालील लक्षणे असतील तर ते अॅपेन्डिसाइटिस सूचित करते –

  • ताप येणे
  • मळमळ किंवा उलट्या होणे
  • भूक न लागणे
  • अतिसाराचा त्रास होणे
  • खेळताना वेदना होणे
  • जेव्हा तुम्ही नाभीजवळ हात ठेवता तेव्हा वेदना वाढते

(वाचा – तुमचं मुलंही वयात आलंय का? वयात आल्यावर मुलं आई-वडिलांपासून का ठेवतात अंतर? कारण अतिशय धक्कादायक)

​अशावेळी उपाय काय?

जर तुमच्या मुलामध्ये वरील लक्षणे असतील किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला शंका असेल की मुलाला ऍपेन्डिसाइटिस आहे. तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच या काळात मुलाला खेळ खेळण्यापासून थांबवावे आणि त्याला खोकला वगैरे होत असेल तर लवकरात लवकर खोकल्यावर उपचार करा.

Related posts