घरातील कामं महिलांपेक्षा पुरुषांना जास्त चांगली यावीत, असं का म्हणाल्या असतील सुधा मूर्ती जाणून घ्या( प्रगत भारत । pragatbharat.com)

Relationship Tips : लग्नानंतर आयुष्य बदलून जाते. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला जागा देणे ही गोष्ट प्रत्येकालाच जमत नाही. एखादे नाते टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण आज कालच्या जगात गोष्टी फार बदल्या आहेत. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली नसेल तर आपण त्या व्यक्तीपासून दूर होतो.पण नातं जपण्याचा प्रयत्न करत नाही.आज कालच्या या जगात नारायण आणि सुधा मूर्ती आपल्याला खऱ्या जीवनाचा अर्थ समजावून सांगतात. या दोघांचे नाते आपल्याला खरोखरचं कपल गोल्स देतात. आयुष्यातील खूप कठीण गोष्टी सुधा मूर्ती अगदी साध्या सोप्या भाषेत समजावताना दिसतात. आज काल दोन्ही जोडीदार काम करतात.अशा स्थितीत पुरुषांनाही घरातील कामे येणं गरजेचे आहे. तुम्हाला सुखी समाधानी आयुष्य जगणायचे असेल तर यासाठीच लेखिका सुधा मूर्ती यांनी काही टिप्स दिल्या आहेत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी या टिप्स दिल्या होत्या चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )

​तुमच्या पत्नीची तुलना आई सोबत करु नका

तुमची आई ही गृहिणी असेल तर तुमच्या आईचा आणि पत्नीचा तुलना करु नका. पूर्ण वेळ गृहणी असणे आणि काम करुन घर सांभाळणं ही गोष्ट फार कठीण असते. ऑफिसमध्ये पुरुष महिला असा भेदभाव केला जात नाही. त्यामुळे प्रत्येकाला समान काम करावे लागते. ऑफिसातील काम सांभाळून घर सांभळणे ही केवळ महिलेची जबाबदारी असू शकत नाही. त्यामुळे पत्नीची तुलना आई सोबत करु नका.

(वाचा :- मूल झाल्यावर आयुष्यातील रोमान्स गायब झालाय? मग नात्याला द्या असा तडका, जुने प्रेम पुन्हा नव्याने मिळेल)

​फुल टाईम गृहिणी असणं खूप वेगळं असतं

पूर्ण वेळ घरातील काम करणे आणि बाहेरील काम करुन घर सांभाळणं ही खूपच वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या पत्नीला घर कामात मदत करा.

(वाचा :- पतीची फसवणूक केल्याची 5 महिलांनी स्वत: दिली कबुली, कारणं ऐकून अंगावर सर्रकन काटा येईल)

​मुलं तुम्हाला पाहात मोठी होतआहेत हे लक्षात ठेवा

तुम्हाला पाहत मुलं तुम्हाला पाहात मोठी आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही जे काही करत आहात त्याचे अनुकरण मुलं करत असतात. त्यामुळे मुलांसमोर तुम्ही कसे वागत आहात या गोष्टीकडे लक्ष द्या.तुम्ही पुढील पिढी घडवत आहात या गोष्टीकडे भान असू द्या.

(वाचा :- ही आहेत फसवणूक करणाऱ्या जोडीदाराची लक्षणे, या मार्गांनी ओळखा तुमचा जोडीदार कसा आहे)

​​एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवणे

तुमच्या जीवनाची तुलना इतरांसोबत करु नका. तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. तुमची स्पर्धा स्वत:शी आहे त्यामुळे प्रत्येक दिवसापेक्षा चांगले वागण्याचा प्रयत्न करा.एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवा त्यामुळे तुमच्यात प्रेम वाढू शकेल.

(वाचा :- ब्रेकअपनंतरही एक्सची आठवणीने असह्य त्रास होतोय?, जाणून घ्या यातून वेदनेतून कसं बाहेर पडावं)

​​एकमेकांच्या विभिन्न गोष्टींचा आदर करा

सुधा मूर्तीनी एका मुलाखती दरम्यान सुखी जीवनासाठी एकमेकांच्या विभिन्न गोष्टींचा आदर करण्याचा सल्ला दिला. दोन व्यक्ती कधीच एकमेकांसारख्या नसतात. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करा. यामुळे नात्याला नवीन नूर मिळायला मदत होईल.

(वाचा :- PM Modi Birthday : आयुष्य कितीही बिझी असो पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईला ‘ही’ गोष्ट आर्वजून देतात)

Related posts