uttar pradesh news in marathi, गटविकास अधिकाऱ्याची एक चूक आणि थेट निलंबन, पाहा सामूहिक विवाहात असं काय घडलं? – uttar pradesh news in marathi chandauli district magistrate suspended 3 officers in case of negligence in mass marriage( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ: उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यासह (Block Development Officer) ३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंमध्ये वधूला पैंजण आणि जोडवी दिले नसल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. चौकशीअंती हा आरोप खरा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर कारवाई करत डीएमने या तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत सदर विकास गटात १० जून २०२२ रोजी सामूहिक विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सरकारकडून भेटवस्तूही दिल्या जातात. यादरम्यान सदर ब्लॉकचे बीडीओ आणि इतर कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याने सामूहिक विवाहात सहभागी झालेल्या वधूला जोडवी आणि पैंजण देण्यात आले नाही.

हेही वाचा -बॉक्समध्ये ठेवलेल्या ४२ लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा उघड

या प्रकरणाची तक्रार चंदौलीचे जिल्हा अधिकारी संजीव सिंह यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्याची दखल घेत डीएम चंदौली यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीत एसडीएम सदर आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचा समावेश होता.

चौकशी समितीच्या अहवालात सदर ब्लॉकचे बीडीओ आणि ग्रामविकास अधिकाऱ्यासह तीन अधिकारी दोषी आढळले आहेत. आरोप सिद्ध झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी चंदौली यांनी या तीन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

हेही वाचा -बेरोजगार मुलाला खडसावलं, मुलाने बापाला थेट तुरुंगाचं दर्शन घडवलं…

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना काय आहे?

उत्तर प्रदेश सरकारने गरीब मुलींच्या लग्नासाठी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना सुरू केली होती. ज्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि पैशांच्या कमतरतेमुळे त्यांच्या लग्नात काही अडचणी येत आहेत, अशा लोकांसाठी ही योजना होती. या योजनेअंतर्गत गरीब नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत दिली जाते. यासोबतच नवविवाहित जोडप्यांना शासनाकडून घरगुती वापराच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात.

तसेच, मुलीला दागिने म्हणून पैंजण आणि जोडवी भेट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी एक अर्ज करावा लागतो जो ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही करता येतो.

हेही वाचा -तीन कोटी रोख, ५० किलो सोनं, १३ काडतुसं, पाहा महंत नरेंद्र गिरींच्या खोलीत काय-काय सापडलं

आधी वर्षावर जाण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती; आता रात्री दोन वाजताही वर्षावर लोकांची गर्दी | बच्चू कडू

Related posts