Legends League Cricket Gujrat Giants Won Toss And Elected To Bowl Manipal Tigers Will Bat First( प्रगत भारत । pragatbharat.com)

LLC 2022, Manipal Tigers vs Gujrat Giants : लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket 2022) स्पर्धेत लखनौच्या ईकाना मैदानावर मणिपाल टायगर्स (Manipal Tigers) आणि गुजरात जायंट्स (Gujrat Giants) या दोन संघात सामना पार पडत आहे. वीरेंद्र सेहवाग कर्णधार असणाऱ्या गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजन सिंह कर्णधार असणाऱ्या मणिपाल टायगर्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

दोन्ही संघाचा दुसरा सामना

दोन्ही संघाचा हा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. दरम्यान गुजरात जांयट्स संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात इंडिया कॅपिटल्स संघाला तीन विकेट्स राखून मात दिली. दुसरीकडे हरभजन सिंहने मणिपाल टायगर्सला मात्र पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंह दोघेही कित्येक वर्षे भारतासाठी एकमेंकासोबत मिळून खेळले आहेत. त्यामुळे दोघानांही एकमेंकाचा खेळ अगदी योग्यप्रकारे माहित आहे. त्यामुळे आज एक अटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो.  

गुजरात जायंट्सचे अंतिम 11 – वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), पार्थिव पटेल (विकेटकीपर), केविन ओ ब्रायन, तिलकरत्ने दिलशान, लेंड्ल सिमन्स, थिसारा परेरा,  रियाद एमरिट, ग्रीम स्वान, केपी अपन्ना, मिचेल मॅक्लेघन आणि अशोक डिंडा. 

मणिपाल टायगर्सचे अंतिम 11 – स्वप्निल असनोदकर, रविकांत शुक्ला, कोरी एंडरसन, मोहमम्द कैफ, ताताइंदा तायबू (विकेटकीपर), हरभजन सिंह (कर्णधार), शिवाकांत शुक्ला, रियान सायबॉटम, मपॉफ्यू आणि परविंदर अवाना.

हे देखील वाचा- Related posts