oiling navel in ayurveda, नाभीचे आरोग्य आणि तुमचे सौंदर्य या गोष्टींचा आहे खूपच जवळचा संबंध, काचेसारख्या त्वचेसाठी घरीच करा हा उपाय – how to a flawless and glowing skin put oil on belly button( प्रगत भारत । pragatbharat.com)

मसाज करणे ही आपली परंपराच मानली आहे. डोक्याला तेल लावल्याने होणारे फायदे, शरीराला तेल लावल्याने होणारे फायदे, तेल मालिश या सगळ्यांबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं आणि वाचलं असेल. अशा स्थितीत ते शरीराला किती फायदेशीर ठरतात हेही तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला माहीत आहे का की, रात्री झोपताना जर तुम्ही नाभीमध्ये फक्त दोन थेंब तेल टाकण्याचे खूप फायदे आहेत. नाभीचा आणि आपल्या सौदर्यांचा खूप जवळचा संबंध आहे. तेला प्रमाणेच इतर गोष्टींचा वापर करुन देखील तुम्ही तुमच्या सौदर्यात अजूनच भर टाकू शकता. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )

​बेसन

नाभीला सुंदर बनवण्यासाठी बेसन गुणकारी आहे. बेसन वापरण्यासाठी बेसनामध्ये मोहरीचे तेल आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट नाभीवर अर्धा तास ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. काही दिवसातच तुमच्या नाभीतील काळेपणा निघून जाईल. त्याच प्रमाण तुमच्या तेजात वाढ होण्यास मदत होईल.

(वाचा :- गेलेले केस पुन्हा येतील व हेअरफॉल पूर्णपणे थांबेल, करीनाची डाएटिशियन ऋजुताने सांगितले केसांसाठी 3 घरगुती पदार्थ)

हळदचा वापर

पी हळद आणि हो गोरी हे तर तुम्ही ऐकलच असेल. हळद तुमच्या त्वचेला सुंदर आणि गोरी बनवते, पण तुम्हाला माहित आहे का की याच्या वापराने तुम्ही तुमच्या नाभीचा काळेपणा दूर करू शकता आणि ती उजळ करू शकता. यासाठी हळदीमध्ये मलई, दूध आणि बेसन मिसळून पॅक तयार करायचा आहे. आता ही पेस्ट नाभीवर दहा मिनिटे लावा. दररोज अंघोळ करताना हे करा. लवकरच नाभीचा काळेपणा दूर होईल. त्याच प्रमाणे तुमची त्वचा सुधारण्यास देखील मदत होईल

(वाचा :- पार्लरमध्ये जायला वेळ नाही? मग या साणांच्या दिवसात घरीच करा मेनिक्युअर, जाणून घ्या प्रत्येक स्टेप)

​बेकिंग सोडा

सोडा मिसळून पेस्ट तयार करा आणि नाभी आणि कंबरेला लावा. अर्ध्या तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी मदत होईल.

(वाचा :- World Coconut Day: नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचे आश्चर्यकारक फायदे,आता टॅनिंगची समस्या होणार कायमची दूर)

​ऑलिव्ह ऑइल

तुमच्या नाभीला मॉइश्चरायझेशन ठेवण्यासाठी आंघोळीनंतर ऑलिव्ह ऑइलने मसाज करा . तुमची नाभी काही दिवसात गोरी आणि स्वच्छ होईल. त्याच प्रमाणे तुमची पचनशक्त देखील सुरळीत होण्यास मदत होईल.

(वाचा :- गेलेले केस पुन्हा येतील व हेअरफॉल पूर्णपणे थांबेल, करीनाची डाएटिशियन ऋजुताने सांगितले केसांसाठी 3 घरगुती पदार्थ)

​​नारळ आणि कडुलिंबाचे तेल

या तेलासाठी एका भांड्यात नारळ आणि कडुलिंबाचे तेल एकत्र करा. रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रित तेलाचे दोन थेंब नाभीमध्ये टाका. थोडा वेळ तसाच राहू द्या. यानंतर बोटांच्या मदतीने हलके मसाज करा. हे दोन्ही तेल एकत्रितपणे त्वचेला आतून चमकण्यास मदत करतात.

(वाचा :- वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीतील वाटाल, बाबा रामदेव सांगितले हेल्दी त्वचेचे रहस्य)

Related posts