अपंग असल्याने पिकलबॉल संघटनेच्या अध्यक्षांना विमानप्रवेश नाकारला( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना अपंग असल्याने व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सने विमानात प्रवेश नाकारल्याचा प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला आहे. बाली येथे होणाऱ्या जागतिक पिकलबॉल स्पर्धेसाठी प्रभू निघाले होते. त्यांचे व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सचे तिकिट होते. दिव्यांग असल्याकारणाने त्यांच्याबरोबर त्यांचे चार सहाय्यक होते. प्रभू हे सहाय्यकांसह बोर्डिंग पास घेण्यास गेले असता त्यांना पास न देता त्यांच्या चार सहाय्यकांना बोर्डींग पास देण्यात आला. पास का दिला नाही याबाबत प्रभू यांनी विचारणा केली असता, “आमचे लो कॉस्ट एअरलाइन्स असल्याने अपंगांसाठी केबिन चेअर उपलब्ध नाहीत. तसेच, तुमच्यासारख्या अपंगांना आमची एअरलाईन प्रवास करु देत नाही तसे आमचे धोरण आहे. तुम्हाला आम्ही तुमची व्हिलचेअर विमानात नेता येणार नाही”, असे उत्तर देऊन त्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली.

“माझा अपघात झाल्यामुळे ३५ वर्षांपासून मी व्हिलचेअरववर आहे. इतकी वर्षे मी जगभर व्हिलचेअरवरच प्रवास केला आहे. माझ्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला अपंग असल्याने प्रवास नाकारला जात असेल तर सामान्यांची काय हाल होत असतील?

– अरविंद प्रभू, अध्यक्ष, भारतीय पिकलबॉल असोसिएशन

Related posts