couple commits suicide, दूध पोळीवरून आईसोबत वाद; नाराज मुलानं आयुष्य संपवलं, पत्नीनंही टोकाचं पाऊल उचललं – couple ends their life after dispute over milk in gurugram( प्रगत भारत । pragatbharat.com)

गुरुग्रामच्या सेक्टर २३ पालम विहारजवळ असलेल्या चोमा गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे. मुलीच्या मृत्यूला तिची सासू जबाबदार असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.

 

गुरुग्राम: गुरुग्रामच्या सेक्टर २३ पालम विहारजवळ असलेल्या चोमा गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे. मुलीच्या मृत्यूला तिची सासू जबाबदार असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. मुलीनं दुधाची मागणी केली होती. त्यामुळे जावई तिच्यासाठी दूध घेऊन आले. यावरून मुलीच्या सासूनं वाद घातला. त्यामुळे जावयांनी विष पिऊन जीव दिला. पतीच्या मृत्यूनंतर मुलीनंही विष प्राशन करून स्वत:ला संपवलं, असा आरोप माहेरच्या व्यक्तींनी केला आहे.

शवविच्छेदनांनतर दोघांचे मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. झारखंडच्या रहिवासी असलेल्या सुईली मित्रा यांची मुलगी जुहीचा विवाह २ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील रामपुरा येथील सुशांता घोषसोबत झाला. यानंतर सुशांता दिल्लीतील एका कंपनीत काम करू लागला आणि चौमा गावात भाड्यानं राहण्यास गेला.
हाण की बडीव! छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणीनं बदडलं; २० सेकंदांत ३८ वेळा चपलांचा प्रसाद
काही दिवसांनी सुशांताची आई त्यांच्या घरी राहण्यास गेली. सासू जुहीला हुंड्यासाठी त्रास द्यायची आणि दररोज वाद घालायची, असा आरोप सुईली मित्रा यांनी केला. गेल्या शनिवारी रात्री जुहीनं पतीकडे दूध पोळी खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सुशांता दूध घेऊन गेला. यामुळे जुहीची सासू नाराज झाली. तिनं मुलाशी वाद घातला. आईशी झालेल्या वादानंतर सुशांतानं रात्री १० च्या सुमारास विष प्राशन केलं. सुशांताची प्रकृती बिघडली आणि त्याला मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पिकनिकचा निम्मा खर्च कर! गुरुजींचा नकार; तीन मित्र संतापले, शिक्षकाला मारुन विहिरीत फेकले
रात्री १२ च्या सुमारास सुशांताचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची माहिती मिळताच जुहीनं रात्री उशिरा विष प्राशन केलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. लग्नानंतर जुहीची सासू तिला हुंड्यासाठी त्रास देत असल्याचा आरोप जुहीची बहिण ज्योतीनं केला. जुही आणि सुशांताला आईपासून वेगळं राहायचं होतं. मात्र तसं होऊ शकलं नाही.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Related posts