Todays Headline 20th September Top News In Marathi Raj Thackeray( प्रगत भारत । pragatbharat.com)

Todays Headline 20th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी…  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 

मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर

मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर येत असून त्यांचा चंद्रपूर जिल्ह्याचा दोन दिवसीय दौऱ्यावर आहे.  पदाधिकाऱ्यांच्या  कामाचा आढावा घेतला जाणार आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हिंगोली दौऱ्यावर

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्ष बांधणीसाठी व त्याचबरोबर आढावा घेण्याकरता हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत  

 अंबादास दानवे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व शेतीचे झालेले नुकसान या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज रात्री 11 वाजता यवतमाळ पोहचत आहे. 

गुजरातमध्ये भाजपची राष्ट्रीय महापौर परिषद 

भाजपच्या देशभरातील सर्व महापौर- उपमहापौरांची परिषद या दोन दिवसीय महापौर परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीसही मार्गदर्शन करण्यासाठी जाणार आहेत. 18 राज्यातील 125 हून अधिक महापौर उपस्थित राहतील. महाराष्ट्रातून धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप कर्पे हे महाराष्ट्रातील एकमेव महापौर उपस्थित राहणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया  ट्वेन्टी-20  मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)  यांच्यातील ट्वेन्टी-20  मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे.  पहिला T20 सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 ला सुरू होणार आहे. 

Related posts