सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा; बुधवारी होणार वितरण

पुणे:सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित करण्यात आले आहेत. येत्या बुधवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजता सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, बावधन, पुणे येथे हे पुरस्कार सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्रा. मंदार दिवाने, सल्लागार समिती सदस्य जीवराज चोले आदी उपस्थित होते.प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार आदी उपस्थित राहणार आहेत.”अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार अनु मलिक, भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद तौफिक कुरेशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील नितीनभाई देसाई, लेफ्ट. जनरल अशोक आंबरे, राजयोगी बीके डॉ. गंगाधर, होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा, व्हाईस ऍडमिरल सतीश घोरमाडे, उद्योजक डॉ. अरुण खन्ना, पटेल ब्रदर्स इंटरनॅशनलचे संस्थापक मफत पटेल, प्रकाश स्टील्सचे प्रकाश कानुगो, जनसेवा फाउंडेशनचे मीना शहा, न्यूट्री ऑर्गनायझेशनचे करणसिंह तोमर, श्रॉफ ग्रुपचे जयप्रकाश श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके (दिव्यांग सेवा) यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.प्रेरक वक्ते व अध्यात्मिक मार्गदर्शक गौर गोपालदास, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया, प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे, हिंदी साहित्यिका वंदना यादव, सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. रमेश रांका, साईधाम कँसर क्लिनिकचे डॉ. स्वप्नील माने, कैलास भेळचे शिवराज मिठारे, सामाजिक कार्यकर्ते सीए राज देशमुख, भारतीय वित्त अधिकारी क्रांती खोब्रागडे, विधिज्ञ ऍड. प्रताप परदेशी, सुरेश इंदू लेझर्सचे संचालक वर्धमान शहा, पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर, अश्विनी डायग्नोस्टिकचे सुनंदा सोमाणी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. स्पिरिच्युअल कॉर्पोरेट ट्रेनर प्रा. डॉ. दिनेश गुप्ता, व्यंकटेश बिल्डकॉनचे चेअरमन व्यंकटेश आसबे, सामाजिक कार्यकर्ते अली असगर देखानी यांना सूर्यदत्त राष्ट्रीय विशेष पुरस्कार, विन एज्युटेकच्या अध्यक्षा खुशबू राजपाल यांना ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’, अरिजित बॅनर्जी, वरुण बुद्धदेव, अरमान उभरानी यांना ‘सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड’ देण्यात येणार आहे.

Related posts