केंद्रीय मंत्री नारायण राणे कितवी शिकलेयत? जाणून घ्या( प्रगत भारत । pragatbharat.com)

Narayan Rane Education Details: भारत सरकारचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांपैकी ते एक आहेत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. नारायण राणे हे आज भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांमध्ये आहेत. पण त्यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु झाली. दरम्यान त्यांच्या शिक्षणाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. त्याची माहिती घेऊया.

महाराष्ट्राचे दिग्गज नेते नारायण राणे यांचा जन्म १० एप्रिल १९५२ रोजी रत्नागिरी येथे एका सामान्य कुटुंबात झाला. नारायण राणे यांच्या वडिलांचे नाव सीताराम राणे तातू सीताराम राणे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई तातू राणे आहे. नारायण राणे (Narayan Rane Education Details) यांनी राज्यसभा उमेदवारीवेळी भरलेल्या माहितीनुसार त्यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले आहे. नारायण राणे यांनी १९७० मध्ये घाटकोपर शिक्षण प्रसारक मंडळ रत्नशाळेतून अकरावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. याशिवाय नारायण राणे यांच्या शिक्षणाबाबत सध्या फारशी माहिती उपलब्ध नाही.

नारायण राणे यांचे शिक्षण कमी असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. शिवसेना-भाजप काळात दुसरे मुख्यमंत्री होऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आपल्या आक्रमक शैली आणि रोखठोक भुमिकेमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

Ajit Pawar Education: भल्याभल्या राजकारण्यांची ‘शाळा’ घेणारे अजित पवार कितवी शिकले माहितेय का?
नारायण राणे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी १९६८ मध्ये शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी युवकांना शिवसेनेशी जोडण्याचे काम केले. यामुळे लवकरच नारायण राणे शिवसेनेत लोकप्रिय झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेही नारायण राणेंच्या कार्यशैलीने प्रभावित झाले आणि त्यांनी नारायण राणेंना चेंबूरमध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख केले.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर कितवी शिकलेयत? माहिती करुन घ्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
यानंतर शिवसेनेत नारायण राणेंचा दर्जा झपाट्याने वाढला. राणे हे १९८५ ते १९९० पर्यंत शिवसेनेचे नगरसेवक होते. १९९० साली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने नारायण राणेंना तिकीट दिले आणि नारायण राणेंनी निवडणूक जिंकून तो निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. १९९६ मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये नारायण राणे महसूलमंत्री झाले. १९९९ मध्ये जेव्हा मनोहर जोशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू नारायण राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले.

बाळासाहेबांचे शिवसैनिक ते उद्धव ठाकरेंचे विरोधक; रामदास कदम कितवी शिकले? ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Related posts