New ICC Cricket Rules: क्रिकेटच्या नियमांत मोठा बदल, 1 ऑक्टोबरपासून होणार लागू; आयसीसीची घोषणा( प्रगत भारत । pragatbharat.com)
ICC Playing Conditions: आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं (ICC) क्रिकेटच्या काही नियमांत बदल करण्याची घोषणा केलीय. दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात चेंडूवर थुंकी लावण्यास तात्पपुरती बंदी घातली होती. नव्या नियमानुसार चेंडूवर थुंकी लावण्यास कायस्वरूपी बंदी घालण्यात आलीय. यासह अनेक नियमांत बदल करण्यात आलाय. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पुरुष क्रिकेट समितीनं मेरीलेबोन क्रिकेट क्लबनं (MCC) महिला क्रिकेट समितीशी केलेल्या नियमांवर चर्चा केली होती. त्यानंतर नियमांत बदल करण्यात आलाय. आयसीसीचे नवे नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. म्हणजेच पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक या नवीन नियमांच्या आधारे खेळवला जाईल.

आयसीसीच्या नव्या नियमांवर एक नजर

जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल.आऊट झालेल्या फलंदाजाच्या क्रीज बदलण्यानं किंवा न बदलण्याचा काहीच फरक पडणार नाही. यापूर्वी फलंदाज झेल बाद होण्यापूर्वी स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर यायचा.

- चेंडूवर थुंकी लावण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलीय. कोरोना महामारीच्या चेडूंवर थुंकी लावण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता हा नियम पुढं कायम ठेवण्यात आलाय.

- कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी-20 मध्ये त्याची वेळ मर्यादा 90 सेकंद आहे. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार टाईम आऊटची मागणी करण्यास पात्र असेल.

- चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास त्याला डेड म्हणून घोषित केला जाईल. तसेच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू नो-बॉल ठरवला जाईल.

-  गोलंदाजाच्या गोलंदाजी (रनअप) दरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंकडून काही अयोग्य वर्तन किंवा जाणूनबुजून चुकीची हालचाल करण्यात आली. तर, पंच या चेंडूला डेड बॉल ठरवतील. तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात 5 धावा जमा होतील.

- जर गोलंदाजानं गोलंदाजी करण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाजानं फलंदाजाला रनआऊट केल्यास त्याला बाद घोषित केलं जाईल. यापू्र्वी असं केल्यास अनफेयर प्ले मानलं जायचं.

- टी-20 प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 30 यार्डच्या आत अतिरिक्त एक फिल्डर ठेवावा लागेल.

हे देखील वाचा-

IND Vs AUS: जसप्रीत बुमराह, हर्षल पटेलच्या एन्ट्रीमुळं भारताचं पारडं जड; कशी असेल प्लेईंग इलेव्हन?

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या पाच टी-20 सामन्यांच्या निकालावर एक नजर

Related posts