Martin Guptill will break sachin’s Record, सचिन तेंडुलकरचा वर्ल्डकपमधील मोठा विक्रम धोक्यात; ऑस्ट्रेलियात हा दिग्गज खेळाडू मोडणार रेकॉर्ड – new zealand anounces their team for wc and martin guptill is set for record 7th t20 worldcup( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणार्‍या टी-२० विश्व चषकासाठी अनेक देशांनी आपले संघ जाहीर केले. मात्र न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला नव्हता. पण आता न्यूझीलंडने देखील १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

२०२१ च्या विश्वचषकाच्या तुलनेत संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. लॉकी फर्ग्युसन, मायकेल ब्रेसवेल आणि फिन ऍलन यांचा काईल जेमिसन, टॉड ॲस्टल आणि टिम सेफर्ट यांच्या जागी प्रवेश करण्यात आला आहे. नुकतेच न्यूझीलंडचा केंद्रीय करार नाकारणारे ट्रेंट बोल्ट आणि जिमी नीशम हे देखील या संघाचा भाग असतील. फिन ऍलन हा केंद्रीय करार प्राप्त करणाऱ्या सर्वात नवीन खेळाडूंपैकी एक आहे. तर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल हा विश्वचषक खेळत एक नवीन रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करणार आहे.

IND vs AUS T20I-भारताला मिळाला नवा गोलंदाज, आता ऑस्ट्रेलियाची काही खैर नाही

मार्टिन गप्टिल मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल यंदाच्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी २० विश्वचषकासाठी खेळणार आहे. न्यूझीलंडच्या १५ खेळाडूंच्या संघात मार्टिन गप्टिलचा समावेश आहे. हा विश्वचषक खेळत मार्टिन गप्टिल विक्रमी सातव्यांदा टी २० विश्वचषक खेळणारा खेळाडू ठरेल. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सहा वेळा विश्वचषक खेळला आहे. तर आता गप्टिल त्याच्या कारकिर्दीत सातव्यांदा विश्वचषक खेळत सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडणार आहे.

IND vs AUS-सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला पराभवाचं टेन्शन! भारतीय संघामध्ये दाखल भारतीय संघामध्ये दाखल झालाय मॅच विनर खेळाडू

न्यूझीलंडचे गोलंदाजी आक्रमण

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत केन विल्यमसन तिसऱ्यांदा न्यूझीलंडचा कर्णधार असेल. न्यूझीलंडच्या गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायचे तर लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी आणि ॲडम मिल्ने सारखे गोलंदाज वेगवान गोलंदाजी आक्रमणात ट्रेंट बोल्टला साथ देतील. इश सोढी फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करेल, तर ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर त्याला साथ देतील.

ब्रेसवेलने २०२२ मध्ये न्यूझीलंडकडून पदार्पण केले. गेल्या काही सामन्यांमध्ये तो फलंदाजीने उत्कृष्ट खेळी खेळून संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. या चमकदार कामगिरीचे फळ त्याला विश्वचषक संघात स्थान मिळण्याच्या रूपाने मिळाले. ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, सँटनर, ब्रेसवेल आणि नीशम हे संघात अष्टपैलू खेळाडूंची भूमिका बजावतील.

युवीने रचलेल्या इतिहासाला १५ वर्षे पूर्ण, खास व्यक्तीसोबत पाहिले त्या सामन्याचे

संघ तिरंगी मालिका खेळणार

टी २० विश्वचषकासाठी निवडलेला संघ ७ ऑक्टोबरपासून घरच्या मैदानावर सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेतून विश्वचषकाची तयारी करेल. हे सामने पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध खेळवले जातील. प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, ‘गेल्या वर्षी स्पर्धेत आम्ही चांगली समाप्ती केली नसली तरीही आमची चांगली कामगिरी झाली होती. ऍलन आणि ब्रेसवेलला पहिल्या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील.’ तिरंगी मालिकेबाबत ते म्हणाले की, ‘यामुळे आम्हाला आमची चांगली तयारी करण्याची संधी मिळेल.’

न्यूझीलंड विश्वचषक संघ:

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, ॲ डम मिल्ने, मार्टिन गप्टिल, लचलान फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट , फिन ऍलन.

Related posts