what should i do immediately in paralysis attack, पॅरालिसिसच्या अटॅकने TV अभिनेत्री Nishi Singh Bhadli यांचे निधन, जाणून घ्या आजार आणि उपचाराची माहिती – tv actress nishi singh bhadli died due to paralysis attack know about the disease and how to prevent it( प्रगत भारत । pragatbharat.com)

‘इश्कबाज’, ‘कुबूल है’ आणि ‘तेनाली रामा’ सारख्या शोमधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री निशि सिंह भदली (Nishi Singh Bhadli) यांच रविवारी वयाच्या 50 व्या वर्षी निधन झालं. त्या गेल्या चार वर्षांपासून पॅरालिसिसच्या तीन स्ट्रोक आणि यामुळे होणाऱ्या समस्यांपासून त्रस्त होत्या. त्यांच्या कुटुंबात पती लेखक अभिनेता संजय सिंह भदली आणि त्यांची दोन मुलं आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना निशी सिंहचे पती संजय सिंह भादली यांनी सांगितले की, दुपारी ३ वाजताच्या सुमारास निशीचा मृत्यू झाला. या वर्षी मे महिन्यात अर्धांगवायूचा तिसरा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे त्यांनी सांगितले. घशाच्या संसर्गामुळे निशीला जेवणही नीट करता येत नव्हते. अगदी शेवटच्या काळात त्यांना आपल्या मुलांनाही ओळखता येत नव्हते.

अर्धांगवायूचा अटॅक काय असतो? पॅरालिसीसची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये न्यूरोलॉजिकल, कोणताही अपघात ज्यामध्ये पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे किंवा काही अंतर्गत जैविक विकृतीची समस्या आहे. पॅरालिसिस अटॅक काय आहे? याच्‍या प्रतिबंधाशी संबंधित सर्व माहिती आपण घेणार आहोत. ज्यामुळे तुम्‍हाला या गंभीर आजारापासून वाचवता येईल. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​पॅरालिसिस अटॅक म्हणजे काय?

यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्विसनुसार, पॅरालिसिस हे तुमच्या संपूर्ण शरीर किंवा शरीरातील काही भागांची हालचाल मर्यादित करते. याची वेगवेगळी कारणे आहेत ज्यामध्ये काही गंभीर आजार देखील होऊ शकतात. याची कारणं ही अस्थायी आणि स्थायी स्वरूपात असू शकतात.

(वाचा – शरीराला तोडून ठेवेल Magnesium ची कमतरता, नाश्त्यामध्ये खायला सुरू करा 5 पदार्थ, रेसिपी जाणून घ्या)

​पॅरालिसिस अटॅकचे कारण

अनेकांना जन्मापासून पॅरालिसिस होतो. याची कारण वेगवेगळी असतात काहींना वैद्यकीय समस्या किंवा अपघातामुळे याचा सामना करावा लागतो. या समस्येस कारणीभूत असलेल्या काही इतरांचा समावेश आहे. जसे की,

 • सेरेब्रल पाल्सी
 • पोस्ट-पोलिओ सिंड्रोम
 • मणक्याची दुखापत
 • स्ट्रोक
 • न्यूरोफायब्रोमॅटॉसिस
 • मेंदूला झालेली दुखापत
 • पार्किन्सन रोग
 • बोटुलिझम

(वाचा – पंतप्रधान मोदी यांच्या डाएटमधील सिक्रेट आलं समोर; लिवर, किडनी, हार्ट आणि लंग्ससाठी अमृत ठरेल ‘हा’ पदार्थ)

​पॅरालिसिस अटॅकची लक्षणे

क्लीवलँड क्लिनिकनुसार, जर तुम्हाला लकवा मारला गेला किंवा पॅरालिसिस अटॅक आला तर तुम्ही तुमचं संपूर्ण शरीराची हालचाल होणे कठीण होतं. काही वैद्यकीय परिस्थितीमुळे हळूहळू अर्धांगवायू देखील होऊ शकतो. जेव्हा असे होते तेव्हा तुम्हाला ही लक्षणे जाणवू शकतात.

 • भावना आणि स्नायूंवर नियंत्रण गमावणे
 • सांध्यांमध्ये पेटके येणे
 • अंगात मुंग्या येणे किंवा सुन्न होणे.

(वाचा – Cyrus Mistry Car Accident मध्ये वाचलेल्या डॉ. अनाहिता यांच्यावर पेल्विक सर्जरी, याबाबत जाणून घ्या सगळं काही)

​असं होतं पॅरालिसिसचे निदान

अनेकदा निदान करणे सोपे असते कारण तुम्ही तुमच्या स्नायूंवरील नियंत्रण पूर्णपणे किंवा अंशतः गमावता. शरीराच्या अंतर्गत भागासाठी ते ओळखण्यासाठी डॉक्टर एक्स-रे, एमआरआय स्कॅन, सीटी स्कॅन, मायलोग्राफी, इलेक्ट्रोमायोग्राफी या इतर इमेजिंग चाचण्यांचा वापर करतात. मात्र आपल्या शारीरिक हालचालींकडे आणि तब्बेतीकडे लक्ष देणे महत्वाचे असते.

Dog Bite Treatment: कुत्रा चावल्यावर 10 मिनिटांच्या आत करा ही 7 काम, नाहीतर वाढू शकतो जीवघेण्या रेबीजचा धोक

​असा कराल पॅरालिसिसपासून बचाव

पॅरालिसिसचा झटका टाळण्यासाठी व्यक्तीने संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. सोबतच सक्रिय राहण्यासाठी दिवसातून किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याचा तुमच्या रक्तदाब, हृदय, कोलेस्टेरॉल आणि शरीराच्या वजनावर सकारात्मक परिणाम होतो. चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. याशिवाय, धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहिल्याने पॅरालिसिस आणि त्याच्याशी संबंधित दुष्परिणामांपासून संरक्षण होऊ शकते.

(वाचा – सांधेदुखीमुळे हृदय-फुफ्फुसासह अनेक अवयवांचे होऊ शकते नुकसान, डॉक्टरांनी सांगितले त्वरीत ठीक होण्याचे 5 उपाय)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Related posts