Misted Trails solely writing responses Indo Sri Lankan long story Dilshan Boange pune print news ysh 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : दोन लेखकांनी मिळून केलेल्या साहित्य निर्मितीची उदाहरणे आहेत. पण नाट्य समीक्षक डॉ. अजय जोशी आणि श्रीलंकेतील लेखक दिनशान बोआंगे यांनी एकमेकांशी काहीही चर्चा न करता, केवळ एकमेकांना लेखनातून प्रतिसाद देत ‘मिस्टेड ट्रेल्स’ ही दीर्घकथा साकारली आहे. या अनोख्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (२५ सप्टेंबर) करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा >>> ‘भारत विद्या’ ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे उद्या निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण

मिस्टेट टेल्स या दीर्घकथेच्या पुस्तकाची निर्मिती कथाही अनोखी आहे. नाट्य समीक्षक असलेले डॉ. अजय जोशी २०१४ मध्ये नाट्य महोत्सवासाठी श्रीलंकेत गेले होते. तिथे लेखक दिनशान बोआँगे यांची भेट झाली. दोघांनी एकत्र नाटके पाहिली, त्याविषयी चर्चा केली. महोत्सवानंतर पुण्यात परतल्यावर काही महिन्यांनी त्यांना दिलशान यांच्याकडून हस्तलिखित आले. त्यात त्यांनी एक कथा लिहिली होती आणि ही कथा पुढे नेण्याची त्यांनी त्यात विनंती केली होती. त्यानुसार डॉ. जोशी यांनी त्यांना लेखनातून प्रतिसाद दिला. पुढे एकमेकांना केवळ ई-मेल लेखनातून प्रतिसाद देत एक दीर्घकथा साकारली. आता अमलताश बुक्सतर्फे या दीर्घकथेच्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; तरुणाला वसतिगृहात डांबून मारहाण करणारे तिघे अटकेत

डॉ. जोशी म्हणाले, की आम्ही दोघांनी मिळून कथा, कादंबरी लिहायची असे काहीही ठरवले नव्हते. अनौपचारिकपणे एकमेकांच्या लेखनाला केवळ प्रतिसाद देत गेलो. कथा, त्यातील पात्रे या विषयी चर्चा करणे शक्य होते. मात्र कटाक्षाने आम्ही संवाद टाळला. एकमेकांना लेखनातून प्रतिसाद देताना कथेत अनेक वळणे आली, आता पुढे कसे जायचे असे प्रश्नही निर्माण झाले. पण त्यातूनच ही प्रयोगशील दीर्घकथा तयार झाली. या प्रकाराला आम्ही एक्स्पिरिमेंटल फिक्शन असे नाव दिले आहे.

हेही वाचा >>> लम्पीच्या लसीकरणासाठी खासगी पशुसंवर्धन पदवीधारकांची मदत

सात वर्षांचा रंजक प्रवास

कथेतील दोन श्रीलंकन आणि एक भारतीय व्यक्ती एका स्टोरीटेलरच्या, जो ईशान्य भारतातील जिवंत असलेला शेवटचा स्टोरीटेल आहे, त्याच्या शोधात फिरतात. हे तिघे वेगवेगळ्या कारणांनी, पण एकत्र राहून त्याचा शोध घेत आहेत. ही कथा गूढ, रहस्य, हत्या अशी वळणे घेत जाते. आम्हा दोघांची लेखन शैली अतिशय वेगळी आहे. दिलशानच्या साहित्यिक प्रकारच्या लेखनात श्रीलंकेतील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे संदर्भ आहेत. गंमत म्हणजे, एकदाही भारतात न आलेल्या दिलशानने कल्पनेने ही कथा भारतातील काही ठिकाणी नेली. तर माझे लेखन पत्रकारी पद्धतीचे आहे. ही कथा म्हणजे सात वर्षांचा रंजक प्रवास आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.Related posts