RTE Admission: आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये असमन्वय, पालकांसह अधिकारीही संभ्रमात – rte admission process parents confused due to uncoordinated( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गतच्या (आरटीई) प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालय आणि जिप. शिक्षण विभागामध्येच असमन्वय असल्याचे समोर आले आहे. शिक्षण संचालनालयमार्फत ही प्रवेश प्रक्रिया संपल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप अशी कोणतीही लेखी सूचना आलेली नसल्याचे जिप. शिक्षण विभागातील अधिकारी सांगत आहेत. ऑनलाइन पोर्टलवरही अद्ययावत माहिती नसल्यामुळे पालकांसह संबंधित अधिकारीही संभ्रमात आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत ५ एप्रिल ते १० मे दरम्यान आरटीई प्रवेशासाठी निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेशांसाठी जवळपास तीन फेऱ्या राबविण्यात आल्या. परंतु, या फेरीनंतर प्रवेश सुरू आहेत की बंद करण्यात आले आहेत याची जिप. शिक्षण विभागाला कोणतीच माहिती नाही. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून याबाबत कोणतीही लेखी सूचना आलेली नसल्याचे या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सांगितले जात आहे.

परंतु, शिक्षण संचालनालयाशी संपर्क साधला असता, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया संपल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. तसेच याबाबत प्रत्येक जिल्ह्याला सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

NEP: मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरही नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी दूरच
सुरुवातीचे काही दिवस वगळता आरटीई प्रवेशांना राज्यभरात पालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. प्रवेशासाठी केवळ ‘एसएमएस’वर अवलंबून न राहता पालकांना आरटीई पोर्टलवरील यादी, नावे पाहण्याबाबत सूचना करण्यात आली होती. परंतु, सद्यस्थितीत या पोर्टलवर कोणतीही अद्ययावत माहिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेश सुरू आहेत की संपले याबाबत पालकही संभ्रमात आहेत. या ऑनलाइन पोर्टलवर लॉगइन करण्यात जिप. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही गेल्या आठवड्याभरापासून अडचणी येत असून, वरिष्ठ कार्यालयामार्फत याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच, प्रवेशासाठी शोधावा लागणार दुसरा देश
आरटीई प्रवेश प्रक्रिया संपल्याचे जाहीर केले असून, जिप. शिक्षण विभागाला हे माहित कसे नाही याचेच आश्चर्य आहे. नवीन फेरीबाबतची सूचना पोर्टलवर अद्ययावत केली जाते. ज्या अर्थी ही माहिती नाही, त्याअर्थी ही प्रक्रिया संपली आहे.

– महेश पालकर, संचालक,

प्राथमिक शिक्षणसंचालनालय

आरटीई प्रवेशाची अंतिम सांख्यिकी

जिल्ह्यातील शाळा – ४२२

उपलब्ध जागा – ४ हजार ९२७

प्रवेशित विद्यार्थी – ३ हजार ९६०

रिक्त जागा – ९६७

FYJC Admission: अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी

Related posts