Ajit Pawar and Jayant Patil do not spend much time in discussions Supriya Sule msr 87( प्रगत भारत । pragatbharat.com)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज(मंगळवार) मतदारसंघातील प्रश्नांबाबत पुण्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा सध्या सुरू असलेला वाद आणि त्यावर सुरू असलेले राजकारणावर देखील प्रतिक्रिया दिली.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात वाद असल्याचे बोलले जात आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चर्चा करायला लोकांना खूप आवडतं. अजित पवार आणि जयंत पाटील हे विकासकामात आणि संघटनाबांधणीत इतके व्यस्त असतात की ते दोघेही चर्चांमध्ये फारसा वेळ घालवत नाहीत. म्हणूनच तर पक्षाची कामगिरी एवढी चांगली झाली आहे. ” असं खासदार सुळे यांनी सांगितलं.

हेही वाचा : विरोधक दिलदार असला पाहिजे, नाहीतर राजकारण… – सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा!

आमच्या घरातील, कुटुंबाबद्दल, आमच्या पक्षाबद्दल आम्ही जेवढी चर्चा करीत नाही. तेवढी चर्चा बाहेर सुरू असते. असंही यावेळी त्यांनी सांगितले. याशिवाय शरद पवार यांना धमकीचा फोन आल्याचं देखील बोललं जात आहे, यावर त्या म्हणाल्या की, “याबाबत आपण पोलिसांकडून माहिती घ्यावी.”

आपण संविधान विसरत चाललो आहोत का? –

विदर्भ दौर्‍यात राज ठाकरे म्हणालेत की, आपल्याला मोठ्या ताकदीविरोधात लढायचं आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आपण संविधान विसरत चाललो आहोत का? देशात आणि राज्यात दडपशाही नाही. त्यामुळे सर्व पक्षांनी दौरे करावेत, आपला विचार मांडावा. ज्याला यश येईल. त्याने मायबाप जनतेची सेवा करावी. त्यामुळे प्रत्येक जण आपला पक्ष वाढविण्यास दौरे करीत असतील. तर त्यामध्ये गैर काय?”Related posts