New Zealand Have Named Their Member Squad For T20 World Cup 2022 Kane Williamson Will Be Captain( प्रगत भारत । pragatbharat.com)

T20 World Cup 2022 : आगामी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा रंगणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी जवळपास सर्व देशांनी आपले संघ जाहीर केले होते. पण दिग्गज संघापैकी न्यूझीलंडने अजून संघ जाहीर केला नव्हता. पण आता न्यूझीलंडनेही आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी केन विल्यमसन हाच कर्णधार असणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या संघात अनुभवी मार्टिन गप्टिल (Martin Guptill) हा देखील असून तो सातव्यांदा T20 वर्ल्डकप खेळणार आहे. यासह फिन अॅलन (Finn Allen) आणि मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell) यांनाही संघात स्थान मिळालं आहे.

WTC गाजवणाऱ्या कायल जेमिसनला संघात स्थान नाही

संघाचा वेगवान युवा गोलंदाज कायल जेमिसन याला संघात स्थान मिळालेलं नाही. त्याच्याजागी अॅडम मिल्ने याला संघात जागा मिळाली आहे. T20 वर्ल्ड कप 2021 दरम्यान दुखापतग्रस्त झालेला लॉकी फर्ग्यूसन आता फिट असल्यामुळे या संघात आहे. वेस्टइंडीजविरुद्ध कमाल कामगिरी करणारा डेवॉन कॉन्वेही संघात आहे. पण टॉड एस्टल आणि टिम सायफर्ट यांंचं संघात नाव नसल्याचं समोर आलं आहे. आयसीसीने न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाबाबत ट्वीट केलं आहे.

 

टी-20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन अॅलन, ट्रेन्ट बोल्ट, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेवॉन कॉन्वे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साउदी .

टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ आमने-सामने

टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेच्या संघाचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या या आठ संघांनी सुपर 12 साठी पात्रता मिळवली आहे. 

कुठे रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा?

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 

हे देखील वाचा- Related posts