Maharashtra News Nashik News Former Corporator Pravin Tidme Of ShivSena Joins Shinde Gat( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik News : नाशिकमधील (Nashik) शिवसेनेचे (Shivsena) नगरसेवक प्रवीण तिदमे (Pravin Tidme) हे शिंदे गटात सामील झाले असून तिदमे यांना शिंदे गटाच्या महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गटाने नाशिक मध्ये जिल्हाप्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांची नियुक्ती केल्यानंतर आता प्रवीण तिदमे यांना गटाकडून महानगर प्रमुख पद देण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक मध्ये शिंदे गटाचा आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गटाने हळूहळू राज्यात विविध ठिकाणी कार्यकारणी उभारण्याचे उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नाशिक मध्ये यापूर्वी योगेश मस्के यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान आता शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर नाशिक मध्ये त्यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर आता महानगर प्रमुख पदाची जबाबदारी दोन खंदे समर्थकांवर सोपवण्यात आली आहे. नाशिक शिवसेना दिंडोरी जिल्हाप्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांची नियुक्ती झाली. भाऊलाल तांबडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबतच शिंदे गटात प्रवेश केला होता.

दरम्यान एकनाथ शिंदे गटाने नाशिक मध्ये देखील नियुक्ती सुरू केल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोर नंतर सेनेला गळती लागली असून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना धक्के धक्का देत आहे नाशिकमध्ये ही एकनाथ शिंदे कडून नियुक्त करण्यात येत असल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

रविवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकार आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेतील आणि भाऊलाल तांबडे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हा प्रमुख पदी अनिल ढिकले तर दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांचे नियुक्ती करण्यात आली. अशात प्रवीण तिदमे यांच्या हातात महानगर प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रवीण तिदमे हे शिवसेनेचे नाशिकमधील माजी नगरसेवक असून महानगर पालिकेच्या कामगार सेनेच्या मंडळावर आहेत. यापूर्वी त्यांनी अनेकदा महापालिकेत आवाज उठविला आहे. 

अशा आहेत नव नियुक्त्या
अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भेट घेतली यावेळी ढिकले यांच्याकडे देवळाली इगतपुरी आणि सिन्नर तर तांबडे यांच्याकडे सुरगाणा कळवण दिंडोरी पेठ आणि निफाड या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली तर नाशिक ग्रामीण पूर्व तालुका प्रमुख पदी सुभाष शिंदे यांची इतर नाशिक ग्रामीण पश्चिम तालुका प्रमुख पदी महादेवपूरचे सरपंच विलास अंड खोरे यांची नियुक्ती करण्यात आली आणि आता प्रवीण तज्ञ यांची महानगर प्रमुख पदी निवड झाली आहे अशाच प्रकारे एक एकरात उद्धव साहेबातात उडी मारत असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसत आहे.

Related posts