पतीसोबत तक्रार करायला पोलिस स्थानकात गेली, बाहेर येताच आरोपीच्या बाईकवर बसून झाली फरार

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Married Women Run Away With Lover: एका व्यक्तीने सोशल मीडियावर (Social Media) महिलेचे अश्लील फोटो अपलोड केले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करायला महिला पतीसोबत पोलिस स्टेशनमध्ये गेली. मात्र, पोलिस स्टेशनच्या (Police Station)दारात पोहोचताच महिला आरोपी युवकासोबतच फरार झाली. या प्रकरणाने महिलेच्या पतीने (Husband And Wife News) संताप व्यक्त केला आहे. तर पोलिसही आश्चर्यचकित झाले. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बरेलीत ही घटना घडली आहे. (Love Affair News)

आरोपीसोबतच झाली फरार

महिलेच्या सासरची मंडळी व माहेरकडील नातेवाईकदेखील तिला अडवत होते. मात्र, कोणाचही काही न ऐकता ती आरोपी युवकाच्या मोटारसायकलवर बसून फरार झाली आहे. त्यामुळं पोलीस स्टेशनच्या आवारात एकच गोंधळ निर्माण झाला होता. हे दृश्य पाहून पोलिस स्टेशनमधील अधिकारीदेखील हैराण झाले. 

२ वर्षांपूर्वी झाले होते लग्न

दोन वर्षांपूर्वी या महिलेचे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी आल्यानंतर तिथेच राहणाऱ्या एका मुलाने या महिलेचे अश्लील फोटो बनवले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. महिलेच्या सासरच्या लोकांनी हे फोटो पाहताच त्यांनी तिला जाब विचारला. तसंच, तिलाच या सगळ्याला जबाबदार धरले. यावरुन तिला सासरकडून येता-जाता टोमणे मारत होते. या रोजच्या त्रासाला वैतागून तिने ही गोष्ट तिच्या माहेरी सांगितली. 

आरोपीविरोधात तक्रार दिली अन् 

विवाहित महिला तिचा पती आणि सासरच्या व माहेरच्या मंडळींसह पोलिस स्ठानकात आरोपी युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. तिथे तिने त्याच्याविरोधात तक्रारही दिली. त्याचवेळी आरोपी युवकही पोलिस ठाण्यात पोहोचला. तिथे जमलेल्या नातेवाईकांना काही कळायच्या आतच ती आरोपी युवकाच्या मोटारसायकलवर बसली आणि तिथून दोघंही फरार झाले. 

महिला आरोपीच्या मोटारसायकलवर बसली तेव्हा काही क्षण कोणालाच काय घडतंय हे कळलं नाही. आरोपीने मोटारसायकल चालू केली व तिला घेऊन निघून गेला. तेव्हा तिच्या सासर व माहेरचे लोकंदेखील तिला थांबवण्यासाठी तिच्या मागे धावले. मात्र आरोपी भरधाव वेगाने तिथून निघून गेला. 

विवाहितेच्या आईने दिली तक्रार

पोलिस ठाण्यातूनच महिला फरार झाल्यानंतर विवाहितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी युवकाने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. 

Related posts