lemon leaf benefits how to use it for weight loss, मुतखडा, शरीरावरची चरबी यासारख्या अजून 3 आजारांतून व्हाल कायमचे मुक्त, फक्त या झाडाच्या पानांचा मनसोक्त वास घ्या – smell lemon leaves or drink lemon tea to get rid of problems like kidney stones insomnia stomach worms weight gain belly fat and migraines( प्रगत भारत । pragatbharat.com)

लिंबाचे (Lemon) फायदे तुम्ही खूप ऐकले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की त्याची पाने देखील कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. लिंबाच्या पानांचा वापर तुम्ही अनेक आजारांपासून बचाव आणि नियंत्रणासाठी करू शकता. पण अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, लिंबाची पाने कडू असून त्याचा उपयोग होत नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही पाने खाण्याचे किंवा त्याच्या फक्त रसाचा वास घेण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. लिंबाच्या पानांचे सेवन कसे करावे? लिंबाची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, पण ती थेट चावून खाणे टाळावे.

तुम्ही ते चहामध्ये मिसळून किंवा ज्यूसच्या स्वरूपात सेवन करू शकता. लिंबाच्या पानांचे औषधी गुणधर्म काय आहेत? यात अँटीव्हायरल, अँटी-ऑक्सिडंट, अल्कलॉइड्स, टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक घटक असतात. यासोबतच त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्ससारखे पोषक घटकही असतात. याशिवाय, यात अँथेलमिंटिक, अँटी-फ्लॅट्युलेंट, अँटीमाइक्रोबियल, अँटी-कॅन्सर, अँटी-इंफ्लेमेटरी प्रभाव देखील आहेत.

किडनीत बनत नाहीत स्टोन

NCBI मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, लिंबाच्या पानांमध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड किडनीमध्ये स्टोन तयार होण्यास आणि वाढण्यास प्रतिबंध करते. अशाप्रकारे तुम्हाला पुन्हा-पुन्हा किडनी स्टोन किंवा मुतखडा होत असेल तर ते तुमच्यासाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही.

(वाचा :- जेनेटिक लठ्ठपणाशी झुंजणा-या डॉक्टरने जिम व डाएट न करता या 1 ट्रिकने घरीच घटवलं तब्बल 35 किलो वजन, बनली प्रेरणा)

मायग्रेन किंवा डोकेदुखीपासून आराम

एका अभ्यासानुसार, मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांसाठी लिंबाची पाने फायदेशीर आहेत. वास्तविक, लिंबाच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. असे मानले जाते की अँटी-ऑक्सिडंट प्रभाव शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून मायग्रेनची समस्या सुधारण्यासाठी कार्य करते. मायग्रेन आणि मानसिक आजारांपासून आराम मिळवण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट्स लिंबाच्या पानांचा वास घेण्याचा सल्ला देतात.

(वाचा :- या शिफ्टमध्ये ऑफिसला जाणा-यांनी कायम राहावं सावध, नाहीतर होतात जीवघेणे आजार, करा आयुर्वेदिक डॉक्टरांचे हे उपाय)

झोपेच्या समस्या संपतील

रिसर्चनुसार, जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा निद्रानाशाची समस्या असेल तर लिंबाची पाने तुमच्यासाठी औषधाचे काम करू शकतात. यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड आणि अल्कलॉइड्स झोपेशी संबंधित समस्या दूर करण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत लिंबाच्या पानांपासून बनवलेले तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(वाचा :- हार्ट अटॅक, लिव्हर फेल, स्ट्रेस, रक्ताच्या गाठी या महाभयंकर रोगांपासून होईल बचाव, फक्त ही गोष्ट खा व पाणी प्या)

वेटलॉस होतं

जर तुम्ही वाढत्या वजनाने हैराण असाल तर लिंबाची पाने तुमची समस्या दूर करू शकतात. लिंबाच्या पानांपासून बनवलेल्या रसामध्ये पेक्टिन नावाचा विरघळणारा फायबर असतो, जो वजन कमी करण्यात प्रभावी ठरतो. लिंबाची पाने पाण्यात उकळवून ते पाणी प्या.

(वाचा :- दारूपेक्षाही विषारी आहे हे ड्रिंक, रोज प्यायल्यामुळे तरूणाचे सर्व अवयव झाले खराब, पित असाल तर ताबडतोब सावधान..!)

पोटातील किडे मारतात

मेडिकल रिसर्चनुसार, लिंबाच्या पानांमध्ये अँथेलमिंटिक गुणधर्म असतात आणि पोटातील जंत दूर करण्याचे काम करतात. अशा स्थितीत लिंबाच्या पानांचा उपयोग पोटातील जंत दूर करण्यासाठी होतो. लिंबाचा रस मधात मिसळून सेवन करू शकता.

(वाचा :- Long Life Secret: मजबूत व 100 पेक्षा जास्त वर्षे आयुष्य जगण्यासाठी करा ही 6 कामे, म्हातारपणीही होणार नाहीत आजार)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Related posts