19th over, IND v AUS : दुसऱ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माची चिंता मिटली; १९वे षटक कोण टाकणार जाणून घ्या… – rohit sharma’s worry cleared before the 2nd t 20 against australia, know who will bowl the dangerous 19th over for indian team( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : भारताच्या पराभवाचे कारण हे १९व्या षटकात आहे, असे आता म्हटले जात आहे. कारण गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये १९व्या षटकामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतासाठी १९वे षटक हे भुवनेश्वर कुमारने टाकले होते आणि त्यामध्ये त्याने भरपूर धावा दिल्या होत्या. पण त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने आज गोलंदाजांसाठी खास खास बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये आता १९वे षटक कोण टाकणार, हे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी रोहितने भारतीय संघाची एक आपातकालीन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी आपली मतं व्यक्त केली. या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचचा विषय होता तो गोलंदाजीचा. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारताला गोलंदाजीमुळेच सामने गमवावे लागले आहे. आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे आता भारताची गोलंदाजी कशी असायला हवी, त्यामध्ये नेमके कोणते बदल व्हायला हवेत आणि कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे. याबाबत रोहित आणि द्रविड यांनी आपली मतं व्यक्त केली. यावेळी भारतीय संघातील जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युजवेंद्र चहल यांना यावेळी खास मार्गदर्शन करण्यात आले.

भारतासाठी १९वे षटक हे महत्वाचं ठरत आहे. त्यामुळे आता हे महत्वाचं षटक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला देण्यात येणार असल्याचे समजते आहे. कारण या सामन्यात भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली जाऊ शकते. हा सामना नागपूरला होणार आहे. उमेश यादवचे हे घरचे मैदान आहे, त्यामुळे त्याला या सामन्यात निश्चितपणे संधी दिली जाईल. त्याचबरोबर हर्षल पटेल बऱ्याच दिवसांनी संघात आला आहे, त्यामुळे तो संघात कायम राहील. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात बुमरा, उमेश आणि हर्षल या तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळेल आणि त्यामध्ये १९ वे हे महत्वाचे षटक टाकण्याची जबाबदारी बुमरावर सोपवण्यात येऊ शकते.

Related posts