When, Where To Watch India Vs Australia T20 Series Know Full Details 2nd IND Vs AUS T20 Nagpur



( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Australia 2nd T20 : आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात टी20 मालिका पार पडत आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना आज पार पडणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास मालिकाही ते आपल्या नावे करतील. तर भारतीय संघ (Team India) सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊ… 

कधी आहे सामना?

आज अर्थात 23 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

कुठे आहे सामना?

हा सामना महाराष्ट्रातील नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कसे आहेत दोन्ही संघ?

भारतीय संघ – 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर. 

ऑस्ट्रेलिया संघ –

आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.

महत्वाच्या बातम्या : 

Related posts