रेल्वे प्रवाशांनो लक्ष्य द्या, विनातिकिट प्रवास करणे महागात पडेल



( प्रगत भारत । pragatbharat.com)

रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असून त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी पुढील एक महिना विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम 12 ते 25 फेब्रुवारी आणि 15 ते 31 मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढून रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य, पश्चिम रेल्वेवर प्रथम श्रेणीच्या लोकल ट्रेनसह द्वितीय श्रेणीच्या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. तसेच वातानुकूलित लोकल गाड्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे तिकीटधारकांना खडतर प्रवास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या. प्रवाशांना वातानुकूलित आणि सामान्य लोकल प्रथम श्रेणी डब्यांमध्ये त्यांची तिकिटे तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासोबतच आता भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

संबंधितांना रेल्वे बोर्डाने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक अधिकारी आणि विभागीय कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षकांचे पथक आवश्यकतेनुसार आणि आरपीएफ, दक्षता आणि इतर विभागांचे कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तिकीट नसल्यामुळे तिकीट काढलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. ट्रेनचे भाडे अतिशय वाजवी आहे. त्याचप्रमाणे यूटीएस आणि इतर सुविधांद्वारे त्वरित तिकीट मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट किंवा पास घेऊनच प्रवास करावा”, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.


हेही वाचा

ठाणे ते नाशिक गाठा अवघ्या 340 रुपयांत


एलटीटीवरील बांधकामामुळे 50 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Related posts