Pune Police Helmet Helmet compulsory for all bike-riding traffic police personnel



( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात सध्या वाहतुकीचे नियम कडक (Pune Traffic Rules)करण्यात येत आहे. त्यातच पुण्यातील पोलिसांना (Pune Police) हेल्मेट सक्ती(Helmet) करण्यात आली आहे.  दुचाकीस्वार पुणे पोलीस कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. हेल्मेट घालून न दिसल्यास थेट पोलिसांवरही कारवाई होणार आहे, असे आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार (PUNE CP Amitesh Kumar) यांनी दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस दलातील कर्मचारी विनाहेल्मेट शहरात फिरत असल्याचे फोटो माध्यमांनी छापून आणले होते. त्यानंतर सगळे नियम हे सर्वसामान्यांसाठीच आहे का?, असा सूर साधारण पुण्यातील नागरिकांकडून ऐकायला मिळाला. त्यानंतर पुणे पोलिसांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे आणि कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलिसांनाही हेल्मेटचा दंड भरावा लागणार आहे. 

नवनियुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी पदभार स्विकारल्यावरच थेट हेल्मेट संदर्भात जनजागृती करु, असं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवस त्यांनी हेल्मेट सक्ती संदर्भात जनजागृती केली मात्र पुणे पोलिसच हेल्मेट वापरत नसल्याचं समोर आलं आणि त्यांनी थेट आदेश काढले. 

पुणेकरांसाठी अजून हेल्मेट सक्ती करण्यात आली नाही. शहरात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे त्यात रोज अनेकांचा जीव अपघातामुळे जात आहे. त्यामुळे पुण्यात हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी पुणेकरांसाठी हेल्मेट सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. 

मागील वर्षाचा आकडा पाहिला तर पुण्यात 4 लाख पुणेकरांवर हेल्मेटसाठी कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून साधारण 36 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यासोबतच पुण्यातील अनेक मोठ्या कंपन्यांना नोटीसा पाठवून त्यांच्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश दिले आहेत आणि शहरात हेल्मेट न वापरणाऱ्यांवर सीसीटीव्हीमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. 

अमितेश कुमारांचे धडाधड आदेश

पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी पदभार स्विकारल्यानंतर दोनच दिवसांत कुख्यांत गुंडांना एखत्र बोलून त्यांची परेड काढली. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हेगारांना तंबी दिली होती. त्यासोबतच पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी गुंडाना सज्जड दम दिला होता. गुन्हेगारी पसरवायची नाही, रिल्स व्हायरल करायचे नाही, अशा कडक शब्दांत सूचना दिल्या होत्या. 

इतर महत्वाची बातमी-

Nagpur Crime : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणाला नवं वळण, घटनेच्या वेळी आणखी दोन जण होते? फॉरेन्सिक तपासणीत उघड

 

 

 

अधिक पाहा..

Related posts