Amazon Prime may charge for dolby vision hdr or dolby atmos support marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amazon Prime : जर तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) ग्राहकांना जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत. याचं कारण म्हणजे, येणाऱ्या काही दिवसांतच Amazon Prime यूजर्सना चांगला कंटेंट पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. याचं कारण म्हणजे डॉल्बी व्हिजन एचडीआर आणि डॉल्बी ॲटमॉस सराउंड साउंड सपोर्ट ॲमेझॉन प्राईम बेस सबस्क्रिप्शनसह प्रदान केले जाणार नाहीत. याचाच अर्थ, जर तुम्हाला Amazon Prime Video साठी Dolby Atmos आणि Dolby Atmos Surround सपोर्ट हवा असेल तर तुम्हाला महागडा रिचार्ज करावा लागणार आहे.  

बेस रिचार्ज प्लॅनमध्ये जाहिराती दिसतील

मागील महिन्यात ॲमेझॉनने या बेस सबस्क्रिप्शनमध्ये जाहिराती जोडल्या होत्या. म्हणजेच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओच्या बेस व्हेरिएंटमध्ये जाहिराती दाखवल्या जातील. आता बेस रिचार्ज प्लॅनमधून चांगल्या दर्जाचे कंटेंट स्ट्रीमिंग थांबविण्यात आलं आहे.

रेवेन्यू वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातायत

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मन पब्लिकेशन 4kFilme, Sony LG आणि Samsung सारख्या स्मार्ट टीव्हीने HDR 10 आणि Dolby Digital 5.1 कंटेट दाखवणं बंद केलं आहे. असे मानले जाते की, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ॲटमॉस कंटेट स्ट्रिमिंग करणे केवळ जाहिरातमुक्त मेंबरशीपसह शक्य आहे.  Amazon Prime Video बरोबर, Netflix, Disney सोबत इतर अनेक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला रेवेन्यू वाढवायचा आहे. या प्लॅटफॉर्मने त्यांच्या स्ट्रीमिंग सेवांमध्ये महसूल वाढवण्यासाठी अनेक बदल केले आहेत.

किंमत आणि वैशिष्ट्ये काय? 

नेटफ्लिक्स यूएसमध्ये 4k कंटेंटसाठी प्रति महिना $22.99 आकारत आहे, तर भारतात प्रति महिना शुल्क 649 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Honor X9b 5G Smartphone : 16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन दमदार फीचर्ससह लॉन्च

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts