बदल्या रद्द करण्यासाठी शिक्षकांची धडपड, पालिका आयुक्तांची भेट घेत मांडले गाऱ्हाणे – mira bhayandar corporation order to transfer teacher( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर

मिरा-भाईंदर महापालिका शाळेतील शिक्षकांच्या तब्बल दीड ते दोन दशकानंतर अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. त्यानंतर आता अनेक शिक्षकांनी बदल्या रद्द करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. काहींनी तर थेट पालिका आयुक्तांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले आहे. बदल्या केल्या, तरी धडे एकसारखेच आहेत, मग शिक्षकांना अडचण काय, असा सवाल यामुळे उपस्थित केला जात आहे.

मिरा-भाईंदर पालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यादरम्यान, काही शिक्षक हे मागील १५ ते २० वर्षांहून अधिक काळ एकाच शाळेत काम करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्याचा अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शिक्षण विभागाला दिले होते.

त्यानुसार हिंदी,उर्दू, मराठी व गुजराती माध्यमाच्या शाळांमधील ८४ शिक्षकांचा अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालानुसार शिक्षण विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश पालिका आयुक्तांनी बुधवारी जारी केले होते. यात शिक्षकांना संबंधित शाळेत २४ तासांत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. यासह. गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना झोपायला वेळ मिळणार, शिक्षण विभाग प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याच्या तयारीत
अनेक वर्षे एकाच शाळेत काढलेली असतानाही बदल्या झाल्याचे समजताच काही शिक्षकांनी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत बदल्या रद्द करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. काहींनी राजकीय नेते मंडळींकडे बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

तर काही महिला शिक्षकांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेत, घरगुती-कौटुंबिक अडचणी आदी किरकोळ कारणे देत बदल्या नकोत, असे मत व्यक्त केले. यावेळी पालिका आयुक्तांनी आदेशानुसार कामावर हजर राहावे, असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Stop Homework: ‘गृहपाठ बंदीमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानास सरकार जबाबदार’
शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना
मिरा-भाईंदर महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. आता शाळेत विद्यार्थ्यांना धडे देताना, शिक्षकांना आपल्या पेहरावाच्या वर कोट परिधान करणे बंधनकारक केले जाणार आहे. दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला असून पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील शाळांच्या वर्गांमध्ये आता कोटधारी गुरुजन विद्यार्थ्यांना धडे देताना दिसणार आहेत.

मिरा-भाईंदर पालिकेच्या हिंदी, गुजराती, मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण ३६ शाळा आहेत. या शाळांची पटसंख्या मागच्या काही वर्षांत घटत असल्याचे दिसले होते. खालावलेला शिक्षणाच्या दर्जा व इतर कारणांमुळे विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षांपासून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रामुख्याने शाळांची रंगरंगोटी, डिजिटल वर्ग, सेमी इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

‘विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनी कोट परिधान करणे बंधनकारक’

Related posts