पुणे : शहरातील चार पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या | Pune Internal transfers of senior police inspectors of four police stations in the city pune print news amy 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

शहरातील चार पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> लम्पी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेची जनजागृती मोहीम

बदली करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती पुढीलप्रमाणे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव – विमानतळ पोलीस ठाणे ते विशेष शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे- बिबवेवाडी पोलीस ठाणे ते विमानतळ पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव- चंदननगर पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे- फरासखाना पोलीस ठाणे ते चंदननगर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक संगीता जाधव- खडकी पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे, प्रकाश पासलकर- विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक(गुन्हे) सहकारनगर , शब्बीर सय्यद- पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना पोलीस ठाणे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस ठाणे.Related posts