शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार, अरविंद सावंत म्हणाले; “बाळासाहेब ठाकरेंच्या…”( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात प्रतिष्ठेशी ठरलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे गट सरशी ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर आता खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या संयमाचा हा विजय आहे. उद्धव ठाकरे विनम्रपणे सांगते होते, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. हा आत्मविश्वास त्यांच्या ठायी क्षणोक्षणी दिसत होता. आमच्या परंपरेचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्काराचा आणि मातोश्रीशी निष्ठावंत असलेल्या शिवसैनिकांचा हा विजय आहे.”

Related posts