wild elephant blessed the forest officer you will also feel surprised after watching the video

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video : आपण नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) बरेचसे व्हिडीओ व्हायरल होताना पाहतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हत्ती (Elephant) हा असा प्राणी आहे जो त्याच्या कुटुंबासोबत पाहायला मिळतो. जंगलात हत्तींचा झुंड पाहायला मिळतो. पण त्या झुंडातून एका हत्तीचे पिल्लू दूर झालेले दिसले की त्यात हत्तीची तळमळ ही पाहायला मिळते. 

भारतीय वन सेवा (IFS) विभागातील तमिळनाडुतील अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) याने ट्विटर (Twitter) वर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत हत्तीच्या पिल्ल्याला हत्तीनीसोबत भेट घडवून आणली आहे त्यामुळे त्या हत्तीने वन अधिकाऱ्यांना आशीर्वाद दिला असे त्या व्हिडीओत दाखवले आहे. (wild elephant blessed the forest officer you will also feel surprised after watching the video)

आणखी वाचा… महिना अखेरीस पैसेच उरत नाहीयेत? ‘या’ पद्धती वापरून करा Saving​

सुशांत नंदा ने गुरुवारी हा व्हिडीओ शेअर केला होता आतापर्यंत त्या व्हिडीओला 16 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि 1  हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.. कॅप्शनमध्ये IFS अधिकारी ने लिहीले की, वन अधिकाऱ्यांना हत्तीच्या पिल्लाला भेटवण्यात यश मिळाले आहे आणि म्हणूनच तो आशीर्वाद वन अधिकाऱ्यांना मिळाला आहे. जंगलात परतण्याआधी हत्तीने वन अधिकाऱ्यांना आशीर्वाद देते. 

इंटरनेट यूजर्सने केले कौतुक

इंटरनेट यूजर्स ने तमिळनाडुच्या (Tamil Nadu) वन अधिकाऱ्यांचे कौतुक आणि प्रशंसा केली आणि कमेंट सेक्शन दिलच्या इमोजीने भरले.  

एका यूजर ने लिहीले की, मानवाचे हे अमूल्य कार्य दुर्मिळ आहे कारण एक दिवस असा येईल जेव्हा प्राण्यांना खरोखर दुर्मिळ दृश्य मिळेल. तर दुसऱ्याने लिहीले की, हत्ती हा प्राणी अनमोल आहेत.”

सोशल मीडियावर हत्ती संदर्भातले व्हिडीओ नेहमीच व्हायरल (Video Viral) होत असतात. या महिन्याच्या सुरुवातीला एका व्हिडीओत छत्तीसगढच्या (Chhattisgarh) वन अधिकाऱ्यांकडून एका हत्तीच्या पिल्लाला मदत करताना दाखवले होते.

आणखी वाचा… अबब! ‘ही’ आहे जगातली सर्वात उंच तरुणी; कर्तृत्वंच नाही तिची उंचीही जगात भारी

जशपूरचे विभागीय वन अधिकारी जितेंद्र उपाध्याय यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, “आम्हाला एक महिन्याचे हत्तीचे पिल्लू कळपापासून वेगळे झाल्याची माहिती मिळाली होती. त्याला वाचवण्यासाठी आम्ही 15 मिनिटांत त्या पिल्लाच्या ठिकाणी पोहोचलो. आरोग्य तपासणी करण्यात आली. हत्तीच्या पिल्लाला पुन्हा कळपाशी जोडले गेले.

Related posts