Central Railway Job TGT PGT Teachers vacancy in bhusawal( प्रगत भारत । pragatbharat.com)

Teachers Recruitment: टीजीटी, पीजीटी शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट आहे. या उमेदवारांना भूसाव रेल्वेअंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. ३ विभागाअंतर्गत एकूण २२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

यासाठी शिक्षकांना पार्ट टाईम नोकरीची संधी मिळणार आहे. ही भरती तात्पुरत्या स्वरुपाची असणार आहे. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना एकूण २०० दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्कॉलरशीप सत्रादरम्यान एकूण ७ दिवस काम करावे लागणार आहे.

पीजीटी अंतर्गत एकूण पाच जागा भरल्या जातील. त्यात केमिस्ट्री, इंग्रजी, हिंदी, मॅथ्स, इकोनॉमिक्समध्ये प्रत्येकी एक जागा भरली जाणार आहे. टीजीटीच्या ८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याअंतर्गत सायन्स (मॅथ्स) साठी एक, आर्ट्सच्या ६, हिंदीची १ जागा भरली जाईल. पीआरटीच्या ९ रिक्त जागा भरल्या जातील. याअंतर्गत म्युसिक, पीटीआय,काऊन्सेलर, आर्ट अॅण्ड क्राफ्ट, इंग्रजी, मॅथ्स, मराठीसाठी प्रत्येकी एक जागा भरली जाणार आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये ग्रंथपाल ते प्राचार्यपर्यंत विविध पदांची भरती
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

४ ऑक्टोबर २०२२ रोजी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. डीआरएम ऑफिस, भूसावळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मुलाखत होणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

IRCTC Recruitment 2022: दहावी उत्तीर्णांना कॉम्प्युटर ऑपरेटर पदाची नोकरी, ‘येथे’ पाठवा अर्ज
आता तुम्हालाही लावता येईल पावसाचा अंदाज, हवामान खात्यात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Related posts