girl killed, रिसॉर्ट रिसेप्शनिस्टचा मृत्यू; पोलिसांना वेगळाच संशय, भाजप नेत्याच्या मुलाला अटक – pauri garhwal kotdwar three accused arrested for receptionist ankita bhandari murder case( प्रगत भारत । pragatbharat.com)

पौडी गढवाल: उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातील एका खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणीची हत्या झाली आहे. अंकिता भंडारी असं या तरुणीचं नाव आहे. अंकिता १९ वर्षांची होती. १८-१९ सप्टेंबरदरम्यान अंकिता गायब झाली. ती कुठे दिसून आल्यास संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यासाठी सोशल मीडियावर मोहिमही हाती घेण्यात आली.

अंकिता भंडारीची हत्या झाल्याची माहिती आता समोर आली आहे. अंकिताचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. जिल्ह्यातील पॉवर हाऊसजवळ असलेल्या शक्ती कालव्यात अंकिताच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. पोलीस आणि एसडीआरएफची पथकं मृतदेहाचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी भाजप नेत्याचा मुलगा पुल्कीत आर्यसह तिघांना अटक केली आहे. अंकिता काम करत असलेल्या रिसॉर्टमध्ये पुल्कीत संचालक म्हणून काम करत होता. अंकिता बेपत्ता झाल्यापासून रिसॉर्टचे संचालक आणि मॅनेजर फरार झाले होते.
मी चूक केली, पण दुसरी संधी मिळायला हवी होती! शेवटचे शब्द लिहून विद्यार्थ्यानं आयुष्य संपवलं
गढवालच्या श्रीकोट गावाची रहिवासी असलेली अंकिता भंडारी गंगा भोगपूरमधील एका खासगी रिसॉर्टमध्ये गेल्या काही महिन्यांपासून रिसेप्शनिस्ट काम करत होती. अंकिता रिसॉर्टवर एका वेगळ्या खोलीत राहायची, अशी माहिती पुल्कीत आर्यनं पोलिसांना दिली. गेल्या काही दिवसांपासून अंकिता मानसिक तणावाखाली होती. त्यामुळेच तिला १८ सप्टेंबरला फिरायला ऋषिकेशला घेऊन गेलो होतो, असं आर्यनं सांगितलं.

आम्ही रात्री उशिरा ऋषिकेशहून परतलो. त्यानंतर रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या खोलीत झोपायला गेलो. त्यानंतर १९ सप्टेंबरला सकाळपासून अंकिता तिच्या खोलीतून बेपत्ता झाली, अशी माहिती आर्यनं दिली. अंकिता बेपत्ता झाल्यानंतर तिचे वडील गंगा भोगपूरला पोहोचले. अंकिताच्या कुटुंबियांनी रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. त्यावेळी सगळ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. रिसॉर्ट संचालक आणि कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्यानं कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
लग्नाच्या १२ वर्षानंतर पूजा म्हणाली, माझं नाव हसीना बानो! नवऱ्याला धक्का बसला अन् मग…
अंकिता भंडारी बेपत्ता झाल्यानंतर आमदार उमेश कुमार यांच्यासह काही पत्रकार आणि संघटनांनी सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं. त्यामुळे पोलिसांनी चक्रं फिरवली. तीन आरोपींना अटक करण्यात आली. रिसॉर्टचा मालक पुल्कीत आर्य, मॅनेजर सौरभ भास्कर आणि असिस्टंट मॅनेजर अंकित गुप्ता यांना अटक करण्यात आली.

Related posts