DTE: ‘स्प्रिंगबोर्ड’वरील अभ्यासक्रमांना ६ लाख विद्यार्थ्यांचा प्रतिसाद – dte free certificate course on infosys springboard( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) अखत्यारित विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या साधारण सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ‘इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड’वरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम विनामूल्य शिकण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. या विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचे शिक्षण मिळणार असून, त्याचा फायदा रोजगार मिळण्यासाठी होणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात तंत्रशिक्षणचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्य़े अडचणी आल्या. या विद्यार्थ्यांना कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळण्यासाठी ‘डीटीई आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’मध्ये करार झाला होता. या करारानुसार विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञान; तसेच रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळाली आहे, अशी माहिती ‘डीटीई’चे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे.

राज्यात दोन वर्षे करोनाचा प्रादुर्भाव होता. या काळात ‘डीटीई’च्या अखत्यारित येणाऱ्या अभ्यासक्रमांमधील आयटी, कम्प्युटर अशा निवडक शाखांमधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट चांगले झाले. मात्र, या शाखा वगळल्यास, इतर शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना; तसेच सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येत आहेत.

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच, प्रवेशासाठी शोधावा लागणार दुसरा देश
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोर्टल करा, SC ची केंद्राला सूचना
हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना घरबसल्या सोयीच्या वेळेनुसार शिकता येतात. त्यानंतर ऑनलाइन परीक्षाही देता येते. त्यामुळे राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थीही या अभ्यासक्रमांचे शिक्षण मिळत आहे. डीटीने एक पाउल पुढे जात, ‘नॅसकॉम’सोबतही करार केला आहे. या अंतर्गतही विद्यार्थ्यांना विनामूल्य सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे ‘डीटीई’चे सहसंचालक दत्तात्रय जाधव यांनी सांगितले.

ज्ञान अद्ययावत होण्यास मदत
या करारानुसार विद्यार्थ्यांना मशीन लर्निंग, आर्टिफिशिएल इंटेलिजन्स, डेटा सायन्स असे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर शिकता येणार आहे. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे ‘नॉलेज अपग्रेड’ होणार असून, अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ‘इन्फोसिस’कडून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याचे डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांचे शुल्क मोजून शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी इन्फोसिस स्प्रिंगबोर्डवरील अभ्यासक्रम शिकण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Internship Courses: विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करुन ‘क्रेडिट’ द्या- AICTE

Related posts