amit shah news, नितीशकुमार कधीच पंतप्रधान होणार नाहीत, अमित शाहांचं थेट बिहारमधून चॅलेंज, जदयूचाही पलटवार – amit shah slam nitish kumar lalu prasad yadav on various issues( प्रगत भारत । pragatbharat.com)

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. बिहारमधील सीमांचल भागात अमित शाह यांचा दौरा होत आहे. पूर्णियामधील सभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर शाह यांनी टीका केली. नितीशकुमार हे कुटनीती करुन पंतप्रधान होणार नाहीत. तर, २०२५ च्या निवडणुकीत बिहारमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा इशारा देखील शाह यांनी दिला. अमित शाह किशनगंजमध्ये भाजप नेत्यांची बैठक घेणार आहेत.

बिहारमध्ये काय व्हायचं हे तुम्हाला माहिती आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या काळात भरदिवसा अपहरण करुन खंडणी मागितली जायची, खून व्हायचे. बिहारमधील सीमांचलमधील जिल्ह्यांतील आदिवासी समुदायावर अन्याय होत आहे. भाजपनं आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केलं आहे. बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असं अमित शाह म्हणाले. त्यांनी नितीशकुमार पंतप्रधान होणार नाहीत, असं म्हटलं तर जदयूनं देखील प्रत्युत्तर देत नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचं म्हटलं.

ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानं शिवसैनिक भावूक; पेढे भरवून आनंद साजरा केला

बिहारमध्ये २०१५ मध्ये जेव्हा आलो होतो. १ लाख २५ हजार कोटी रुपये बिहारच्या विकासासाठी खर्च करण्याचं आश्वासन दिलं होतं. महामार्ग निर्मितीसाठी १४ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.ग्रामीण रस्त्यांसाठी २२ हजार कोटी, रेल्वेसाठी ५६ हजार कोटी, विमानतळ विकासासाठी १२८० कोटी, पर्यटनासाठी १६०० कोटी, पेट्रोलियम गॅससाठी ३२ हजार कोटी आणि विजेसाठी १४ हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा अमित शाह यांनी केला.

मला वाटलं आदित्यचं लग्न मुलीशी जमलं… शिवसेनेचा आनंद राणेंना खुपला

नितीश कुमार यांनी पहिल्यांदा भाजपला धोका दिला. भाजपनंतर जीतनराम मांझी, रामविलास पासवान, लालूप्रसाद यादव यांना धोका दिला. पुन्हा भाजपला धोका देत नितीशकुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत हातमिळवणी केली. मला नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी बिहारच्या जनतेसोबत धोका केल्याचा आरोप अमित शाह यांनी केला.

नितीशकुमार यांनी यापूर्वी सीबीआयनं राज्यातील प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी केली होती. आता तेच नितीशकुमार बिहारमध्ये सीबीआयवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला.

दसरा मेळावा: कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले…

ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानं शिवसैनिक भावूक; पेढे भरवून आनंद साजरा केला

Related posts