Two Friends Killed In Bus Accident In Jalgaon( प्रगत भारत । pragatbharat.com)

jalgaon News Update : जळगावमधील जिवलग मित्रांवर काळाने घाला घातलाय. भरधाव बसच्या धडकेत जळगावमधील दोघे ठार झाले आहेत. अमळनेरहून शिरपूरकडे जाणाऱ्या बुलेटला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली.  या भीषण अपघातात बुलेटवरील डॉक्टर असलेल्या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अमळनेर बेटावद रस्त्यावरील हॉटेल माधवी जवळ घडली आहे. डॉ. महेंद्र शांतीलाल बोरसे (वय, 39 रा. पाडसे ता. अमळनेर ) आणि डॉ. अरूण नथ्थू साळुंखे (वय, 38 रा. हिंगोण खुर्द ता. अमळनेर ) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत.  

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण नथ्थू साळुंखे हे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलेट ( क्रमांक एमएच 18 एव्ही 311) ने अमळनेर-बेटावद रस्त्याने शिरपूरकडे जात होते. ब्राम्हणे फाट्याजवळील हॉटेल माधवी जवळ समोरून येणारी शिरपूर-अमळनेर बस क्रमांक (एमएच २० बीएल ३९८१) ने बुलेटला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बुलेटवरील डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण साळुंखे हे जागीच ठार झाले.

ही बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर दोघांचे मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. याप्रकरणी रविंद्र जगन्निा मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहे.  दरम्यान पाडसे येथील डॉ. महेंद्र बोरसे हे परिसरात मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ तर अरुण साळुंके यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे. 

Related posts