rohit sharma and dinesh karthik, रोहित शर्माने सामना संपल्यावर फक्त एका गोष्टीमुळे जिंकली सर्वांची मनं, Videoमध्ये पाहा काय केलं – after the 2nd t 20 rohit sharma won everyone’s heart because of only one thing, see what he did in the video( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : रोहित शर्माने मैदानात तुफानी फटकेबाजी केली. हा सामना रोहितने गाजवला. पण सामना संपल्यावर रोहितने एक अशी गोष्ट केली की, त्यामुळे त्याने सर्वांची मनं जिंकून घेतली. रोहितचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.

रोहित शर्मा हा शांत क्रिकेटपटू आहे. पण सध्याच्या घडीला तो काहीवेळा रागावल्याचे पाहायला मिळाले आहे. पण रोहित मनात मात्र राग ठेवत नाही आणि नेहमी संघाच्या भल्याचाच विचार करत असतो, हे पुन्हा पाहायला मिळाले. रोहितने हा सामना भारताला एकहाती जिंकवला. लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या एकामागून एक बाद होत असताना रोहितने भारताचा डाव फक्त सावरला नाही तर विजयाचा पाया रचला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित दिनेश कार्तिकवर भडकल्याचे म्हटले जात होते. रोहितने यावेळी दिनेश कार्तिकचा गळा पकडल्याचे फोटो व्हायरल होत होते. पण आजच्या सामन्यात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. आजच्या सामन्यात रोहितने नाबाद ४६ धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटकात जेव्हा भारताला ६ चेंडूंत ९ धावांची गरज होती तेव्हा दिनेश कार्तिक फलंदाजीला आला आणि त्याने दोन चेंडूंमध्येच सामना संपवला. त्यानंतर रोहितने दिनेशला घट्ट मिठी मारल्याचे पाहायला मिळाले. या एका गोष्टीमुळेच रोहितने क्रिकेट चाहत्यांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत.

रोहितने आजच्या सामन्यात आपण कशी फटकेबाजी करू शकतो, हे पुन्हा दाखवून दिले. रोहितने यावेळी आपली एक चूक यावेळी सुधारली. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित हा फलंदाजीला आल्यापासून पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करायचा. पण ही चूक त्याने आजच्या सामन्यात केली नाही. ही चुक त्याने आजच्या सामन्यात सुधारली. पहिले तिन्ही चेंडू तो शांत होता. त्यानंतर रोहितने एक षटकार मारला. त्यानंतरही रोहित जास्त आक्रमक झाला नाही. त्यानंतर थेट दुसऱ्या षटकात त्याने षटकार खेचला. रोहित हा असा फलंदाज आहे की, तो स्थिरस्थावर झाल्यावर मोठी फटकेबाजी करतो आणि हीच गोष्ट रोहितने यावेळी करून दाखवली.

Related posts