Ind Vs Aus 2nd T 20 timing, IND vs AUS : दुसरा सामना ९.३० वाजता सुरु होणार, पण किती षटकांचा होणार जाणून घ्या… – india vs australia 2nd t 20 in nagpur will beginning at 9.30 pm and know how many overs will be played( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : पावसामुळे नागपूरचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना आता उशिरा सुरु होणार आहे. त्यामुळे या सामन्यातील षटकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर हा सामना किती षटकांचा होईल, हे पंचांनी आता स्पष्ट केले आहे.

या सामन्याचा टॉस ९.१५ वाजता होईल. त्यानंतर ९.३० वाजता हा सामना सुरु होईल. यावेळी आठ षटकांचा हा सामना होणार आहे. प्रत्येक खेळाडूला जास्तीत जास्त दोन षटकं टाकता येतील आणि पॉवर प्ले हा दोन षटकांचा असेल. या सामन्याचा टॉस ६.३० वाजता होणार होता. पण त्यावेळी पावसामुळे मैदान निसरडे होते आणि पंचांनी थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पंचांनी रात्री ८.०० वाजता मैदानाची पाहणी करता येईल, असे सांगितले होते. दोन्ही पंच मैदानाची पाहणी करण्यासाठी ८.०० वाजता आले,पण तेव्हाही मैदान निसरडे होते. त्यामुळे पंचांनी पुन्हा रात्री ८.४५ वाजता पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

सामने कुठे पाहता येणार, जाणून घ्या…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ही स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर लाइव्ह पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स समूहातील काही चॅनेल्सवर हे सामने पाहता येतील. त्याचबरोबर या सामन्यांचे लाइव्ह अपडेट्स तुम्हाला महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर पाहता येऊ शकतात.

विश्वचषकासाठी होऊ शकतात प्रयोग…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ही विश्वचषकासाठी महत्वाची ठरू शकते. कारण विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर भारताचा चांगला सराव होऊ शकतो. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला अजून काही प्रयोग करायचे असतील तर त्यांना या मालिकेत करता येऊ शकतात.

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ :
ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.

Related posts