uttar pradesh police recruitment exam actress sunny leone appplication

( प्रगत भारत । pragatbharat.com)

UP Police Constable Exam 2024 : उत्तर प्रदेश सरकारने 60000 हजार जागांवर पोलीस भरती (Police Recruitment) सुरु केली आहे. यासाठी 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 मध्ये भरती परीक्षा पार पडली. राज्यभरातील 2300 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. यासाठी जवळपास 48 लाख तरुण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिने देखील उत्तर प्रदेश पोलीससाठी अर्ज केला आहे. वाचून तुम्हालाही धक्का बसला ना. वास्तविक एका उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे नाव आणि फोटो चिकटवण्यात आला होता.  हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

हे प्रवेशपत्र (Application) सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या उमेवराराच्या प्रवेश पत्रावर सनी लिओनीचा नाव आणि फोटो होतो, तो तरुण महोबा जिल्यातील रगौलिया बुजूर्ग गावातील राहाणारा आहे. त्याचं नाव धर्मेंद्र कुमार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. जबाबात या तरुणाने दिलेली माहिती ऐकून पोलिसही हैराण झाले. या तरुणाने गावताली एका सायबर कॅफेत पोलीस परक्षेसाठी अर्ज भरला होता. पण आपल्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचं नाव आणि फोटो कसा आला याचा उलगडा मात्र तो करु शकला नाही.

असा झाला खूलासा
या संदर्भात, UPPRPB ने X वरील आपल्या पोस्टमध्ये माहिती दिला आहे.  अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 17 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान करेक्शन विंडो सुरु  करण्यात आली होती. अशा परिस्थितीत ज्याच्याकडे त्या उमेदवाराचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड होता. त्याने अर्जदाराचे नाव, वैयक्तिक तपशील आणि छायाचित्राशी छेडछाड केली आणि त्याऐवजी सनी लिोनचं नाव आणि फोटो टाकला.

या घटनेनंतर यूपीपीआरपीबीने उमेदवारांना सूचना केल्या आहेत.  उमेदवारांनी त्यांच्या अर्ज फॉर्मशी संबंधित कोणतीही माहिती जसे की वैयक्तिक तपशील, लॉगिन आयडी आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये. आयपी ॲड्रेस ट्रेस केल्यानंतर महोबा पोलिस अधीक्षकांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पेपर लीक करण्याचा प्रयत्न
दरम्यान, परीक्षेत कॉपी आणि पेपर लीक करण्याचा प्रतयत्न केल्याप्रकरणी युपी पोलिसांनी 244  जणांना अटक केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा पोलिसंनी केला आहे. पण सोमवारी महोबा, ललितपूर आणि एटा भागात एका विषचाचा पेपर लीक झाल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. त्या विषयाची परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करत उमेवारांनी गोंधळ घातला.

Related posts