माजी महापौर राहुल जाधव यांच्याहस्ते कामाला सुरूवात

पिंपरी (pragatbharatnews):उघड्या वीजवाहिन्यांमुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत उच्चदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मोशी आणि संभाजीनगर येथील वीजवाहिनी भूमिगत करण्याचे काम सुरू केले असून, त्यामुळे ४० हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे.भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे देहू रस्ता, मोशी, संभाजीनगर कॉलनी १, २ आणि ३ परिसरातील घरांवरुन जाणारी उच्चदाब वीजवाहिनी भूमिगत करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्या अनुशंगाने पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ हजार मीटर वीजवाहिनी भूमिगत करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.यावेळी माजी महापौर राहुल जाधव,…

Read More

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स व मोहिनी ब्रँड चिंचवड शाखेस खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची भेट

चिंचवड (www.pragatbharat.com):शिवपुत्र संभाजी महानाटया मधील संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असलेले व शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या चिंचवड येथील मुख्य शाखेत सदिच्छा भेट दिली. यावेळी सुवर्ण पेढीचे मालक दिलीप सोनिगरा, करण सोनिगरा सोनिगरा परिवारातील सदस्य आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या संपूर्ण टीमने डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वागत शालपुष्पगुच्छ व स्तचिन्ह देऊन केले.यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांचे चाहते आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या ग्राहकांनी गर्दी केली. यावेळी कुमार नेवाळे, संगीता तरडे, दिनकर चिंचवडे, नितीन चिंचवडे, शिवाजी सावंत आदी मान्यवर व्यक्तीही यावेळी उपस्थिती होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोनिगरा ज्वेलर्स…

Read More

खासदार अमोल कोल्हे यांची चिंचवड येथील मुख्य शाखेत सोनिगरा ज्वेलर्सच्या शोरूमला भेट दिली.

चिंचवड (pragatbharat.com) – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या (Chinchwad) चिंचवड येथील मुख्य शाखेत भेट दिली. सुवर्ण पेढीचे मालक दिलीप सोनिगरा, करण सोनिगरा, सोनिगरा परिवारातील सदस्य आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या संपूर्ण टीमने डॉ. कोल्हे यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. कोल्हे यांचे चाहते आणि सोनिगरा ज्वेलर्सच्या ग्राहकांनी गर्दी केली.कुमार नेवाळे, संगीता तरडे, दिनकर चिंचवडे, नितीन चिंचवडे, शिवाजी सावंत यांचीही यावेळी उपस्थिती होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोनिगरा ज्वेलर्स शोरूम मधील विविध सोन्याचे आणि चांदीचे दागिने पाहिले. त्यामध्ये सोन्याचे ब्रेसलेट, चेन, अंगठीमधील शिवाजी महाराज आदींचे त्यांनी कौतुक केले. शोरुमच्या दोन्ही मजल्यावर…

Read More

चिखलीतील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे यासह 22 कामांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (दि.15) होणार

पिंपरी-चिंचवड (pragatbharat.com) – चिखलीतील जलशुध्दीकरण प्रकल्प, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, चिंचवडमधील तारांगण प्रकल्पाचे उद्‌घाटन आणि पालिकेच्या (PCMC) नवीन 13 मजली प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन यासह 22 कामांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि.15) होणार आहे.चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील पंप हाउस, चिंचवडमधील तारांगण प्रकल्प, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, बोऱ्हाडेवाडीतील शाळेची इमारत, मोशीतील सब फायर स्टेशन, रावेतमधील उद्यान, वायसीएम रूग्णालयातील सीएसएसडी प्रकल्प, ब क्षेत्रीय कार्यालयाची नवीन इमारत, कृष्णानगर येथे लॉन टेनिस कोर्ट, नेहरूननगर येथील शाळेची इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, घरकुलमधील भाजी…

Read More

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पुणे ,मा. ना. श्री. अब्दुल सत्तार, मंत्री कृषि, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत

पुणे : महसूल विभागाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न शेतकऱ्यांना वेळेत गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खते मिळतील याकडे लक्ष द्या- कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुणे, दि. ८: आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, किटकनाशकांची अजिबात कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी; बियाणे, कृषि निविष्ठांच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे आणि भरारी पथके कार्यान्वित करुन चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करत गैरप्रकारांना आळा घालावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. विधानभवन येथे आयोजित पुणे महसूल विभाग खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे…

Read More

हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारीत सात प्रस्ताव धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना सादर..

पिंपरी (प्रगत भारत न्युज):- मराठवाडा मुक्तीसंग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती धाराशिव यांच्या संयुक्तपणे देशप्रेम व हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारीत सात प्रस्ताव धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम राष्ट्रभक्ती संस्करण महोत्सव तुळजापूर येथे आयोजित करणे, हैदराबाद मुक्तिसंग्राम आझाद मुक्तापूर स्वराज्य महोत्सव जामगाव (ता. माढा) येथे आयोजन करणे, हुतात्मा श्रीधरवर्धक जन्मशताब्दी वर्षानिमित्त अमृतायण मराठवाडा मुक्तीसंग्राम वड महावृक्ष संवर्धन अभियान राबविणे, धाराशिव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम प्रेरणास्थळ निर्माण संकल्प करणे, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ राष्ट्रीय शाळा हिप्परगा येथे मराठवाडा…

Read More

सुरुवातीला अडले उद्घाटनाचे घोडे; मग डामडौल सोडून सुरु केला पाणीपुरवठा…

पिंपरी (प्रगत भारत न्युज) :- पिंपरी-चिंचवड शहरासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नसल्याचे त्या केंद्राचे उद्घाटन गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. असे असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्या केंद्रातून दररोज ५० एमएलडी पाणी नागरिकांना वितरीत करण्यात येत आहे. हा पुरवठा प्रायोगिक तत्वावर सांगण्यात येत आहे.शहराची वाढती लोकसंख्या व शहराचा विस्तार लक्षात घेऊन आंद्रा आणि भामा-आसखेड धरणात २६७ एमएलडी पाणी साठा राज्य शासनाने महापालिकेसाठी मंजुर केला आहे. हे दोन्ही प्रकल्प अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. तात्पुरता उपाय म्हणून निघोजे येथे अशुद्ध जलउपसा केंद्र उभारून इंद्रायणी…

Read More

महापालिकेच्या घनकचरा कर आकारणीच्या निषेधार्थ आकुर्डीत कर पावत्यांची होळी…

पिंपरी (प्रगत भारत न्युज) :- महापालिकेकडून घनकचरा कर आकारणी सुरू केली आहे. याच्या निषेधार्थ आकुर्डी व्यापारी संघटना आणि आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने कर पावत्यांची होळी करण्यात आली. आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा कुऱ्हाडे, मनसे नेते के. के. कांबळे, ज्ञानेश्वर ननावरे, नारायण गोसावी, मधुकर देसले, चंद्रकांत इंगळे, वसंत सोनार, आत्माराम काळभोर, अतुल शितोळे, शिवाजी मिसाळ, विद्या मिसाळ, सारिका कोरटकर, सृष्टी कुऱ्हाडे आणि आकुर्डी मधील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला. घनकचरा कर आकारणी लवकरात लवकर रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात…

Read More

चिंचवडमध्ये भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर खंडणी विरोधी पथकाची कारवाई..

पिंपरी (दि. १० मे २०२३) :- चिंचवड येथील चितराव गणपी मंदीराजवळ भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणा-या मे महाराष्ट्र मिल्क डेअरी या व्यावसायिकावर पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी एकत्रितपणे कारवाई केली.डेअरीचे मालक साजीद मुस्तफा शेख (वय ३२ वर्षे रा. शिवर्तीथनगर, संभाजी बारणे यांचे ऑफीसजवळ, पडवळनगर थेरगाव), जावेद मुस्तफा शेख (वय ३८ वर्षे रा. सदर), कामगार राकेश श्रीबुध्दराम सिंग (वय २६ वर्षे रा. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं. २९५, चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय २७ वर्षे), अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय २२ वर्षे…

Read More

नात्यातील विवाहामुळे ‘थॅलेसेमिया’ आजाराला मिळतेय निमंत्रण..

पिंपरी ((प्रगत भारत न्युज) :- नात्यातील विवाहामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणाऱ्या थॅलेसेमिया या आजाराला निमंत्रण मिळते. तसेच गतिमंद, मतिमंदतेचा धोका वाढत आहे. व्यंग व विविध आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.थॅलेसेमिया हा हिमोग्लोबिनची कमतरता, आनुवंशिकता व रक्तात आढळणारे दोष यामुळे होतो. एकाच नात्यातील किंवा एकाच कुळातील व्यक्तीचे लग्न झाल्यास हा आजार होतो. पूर्वी एक नाड आली की लग्न करू नये, असा सल्ला ज्येष्ठ मंडळी देत असत. अपत्याच्या जन्मावेळी गुंतागुंत होऊन हा आजार होतो. नात्यामध्ये लग्न न केलेले चांगले. थॅलेसेमियाची लक्षणे व उपचार… थॅलेसेमिया आजाराची लक्षणे अगदी…

Read More