पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – रस्त्याच्या कडेला मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरूणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करण्यात आले. पिंपळेगुरव येथे बुधवारी (दि. ३) ही घटना घडली.याप्रकरणी राहुल सुनील मोरे (वय २३, रा. पवनानगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अथर्व शशिकांत देशपांडे (रा. पवनानगर, पिंपळेगुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मोरे हे त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत पवनानगर येथील सार्वजनिक रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी आरोपी अथर्व देशपांडे तिथे आला. त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून राहुल यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर राहुल यांच्यावर कोयत्याने…

Read More

जमीन विक्रीच्या व्यवहारात एकाची २७ लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – जमीन विक्रीसाठी व्यवहार ठरवून दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख रुपयांची फसवणूक केली. मोशी येथे डिसेंबर २०२१ ते २८ जून २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.याप्रकरणी रुपेश वासुदेव नाईकरे (वय ३४, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज सरायनाथ रॉय (वय ४८, रा. उद्यमनगर, पिंपरी), अशोक सखाराम टाकसाळ (वय ४१, रा. संतनगर, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोशी येथील दोन जागांचा व्यवहार एक कोटी रुपयांना करण्याचे फिर्यादी यांच्यासोबत ठरवले. फिर्यादीकडून इसार म्हणून ३० लाख रुपये…

Read More

ट्रेरलमधून माल पोहचवण्यासाठी साडेचार लाख रुपये घेऊन फसवणूक

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – ट्रेलरमधून मुंबई येथील माल कर्नाटकात पोहोचवण्यासाठी साडेचार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी येथे २१ डिसेंबर २०२३ ते 3 जानेवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली.याप्रकरणी अजयकुमार अवधेशकुमार दुबे (वय ३०, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमप्रकाश चौधरी (कंपनी पत्ता – सिफा लॉजिस्टिक, कळंबोली, नवी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजयकुमार आणि आरोपी ओमप्रकाश यांची तीन महिन्यांपूर्वी फोनवरून ओळख झाली होती. अजयकुमार यांनी मुंबई येथील बंदरातून…

Read More

आई आणि बहिणींना मारहाण केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – आई आणि दोन बहिणींना काठीने मारहाण केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी सांगवी येथे ३० व ३१ डिसेंबर २०२३ रोजी ही घटना घडली.निलेश रतन वंजारे आणि त्याची पत्नी (दोघे रा. संत तुकाराम नगर, नवी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश यांच्या आईने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि सुनेने त्यांच्याशी वाद घालत हाताने मारहाण केली. दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांच्या दोन मुली फिर्यादी यांना बघण्यासाठी आल्या. आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करून फिर्यादी आणि त्यांच्या…

Read More

दारूच्या नशेत मित्राने दगडाने मारल्याने तीन बरगड्या फ्रॅक्चर

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) –  जुन्या भांडणाच्या कारणावरून दारूच्या नशेत एकाने मित्राच्या पोटावर दगडाने मारल्याने तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. चिंचवड, शाहूनगर येथील शाहू उद्यानात मंगळवारी (दि. २) ही घटना घडली.सचिन अशोक जगताप असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन यांच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण कैलास पवार (वय ३३, रा. स्पाईन रोड, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सचिन जगताप आणि आरोपी भूषण पवार हे मित्र आहेत. ते मंगळवारी दुपारी शाहूनगर येथील शाहू उद्यानात बसले होते. तिथे त्यांच्यात…

Read More

दुचाकीच्या चाकावरून घरफोडीतील आरोपीला बेड्या

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – मोईल येथे ३० लाखांची घरफोडी केलेल्या एका चोरट्याला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत दुचाकीच्या चाकावरून पोलिसांनी अटक केली.आमीर शब्बीर शेख (वय २५, रा. निगडी प्राधिकरण. मूळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई येथे २५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री पावणे दहा वाजताच्या कालावधीत घरफोडी झाली होती. याप्रकरणी नितीन शहाजी कर्पे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याने कर्पे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचे ग्रील कापून आत प्रवेश करत घरातून ४७.८ तोळे सोने आणि ५ लाख १५…

Read More

माझ्या अभिनयाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली – प्रशांत दामले

चिंचवड, दि. 1 जानेवारी – माझे रंगमंचावरील पदार्पण चिंचवड येथे शिक्षण घेत असताना झाले. कॉलेज मध्ये असताना एका नाटकात प्रथम काम केले होते. तिथेच माझ्या अभिनयाची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे मत सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या हस्ते सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दामले बोलत होते. कार्यक्रमासाठी मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त केशव विद्वंस, देवराज डहाळे, जितेंद्र देव, ॲड. राजेंद्र उमाप, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर आदी उपस्थित…

Read More

श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबरपासून..

पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२३) :- श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव 29 डिसेंबर ते 02 जानेवारी 2024 या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे 462 वे वर्ष आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे उद्‍‍घाटन, सन 2024 च्या दिनदर्शिकेचे अनावरण आणि ‘भक्तीभाव…

Read More

पिंपरी चिंचवड शहरात शंभरावे मराठी नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार..

(पिंपरी) :- शहरांचा एकतर्फी विकास होत चालत नाही, तर साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक, नाट्य चळवळ वाढविण्यास भाऊसाहेब भोईर यांनी गेली अठ्ठावीस वर्ष काम केले आहे. त्यामुळे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळाला आहे. हे नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा स्वागत समिती अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे मराठी नाट्य संमेलन सहा आणि सात जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण अजित…

Read More

माजी महापौर राहुल जाधव यांच्याहस्ते कामाला सुरूवात

पिंपरी (pragatbharatnews):उघड्या वीजवाहिन्यांमुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत उच्चदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मोशी आणि संभाजीनगर येथील वीजवाहिनी भूमिगत करण्याचे काम सुरू केले असून, त्यामुळे ४० हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे.भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे देहू रस्ता, मोशी, संभाजीनगर कॉलनी १, २ आणि ३ परिसरातील घरांवरुन जाणारी उच्चदाब वीजवाहिनी भूमिगत करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्या अनुशंगाने पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ हजार मीटर वीजवाहिनी भूमिगत करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.यावेळी माजी महापौर राहुल जाधव,…

Read More