मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पिं -चिं येथे १९ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाला उपस्थित राहून उद्‌घाटन करणार…!

पिंपरी । /pragatbharat.com मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे.. मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत) अश्विन बापट ( एबीपी माझा) रेश्मा साळुंखे (झी २४ तास) निकिता पाटील (टीव्ही 9)अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती – जमती, पत्रकारितेतील अनुभव, पत्रकारितेतील प्रवास यावर विवेचन करणार आहेत.. सर्व लोकप्रिय अँकर्स मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येऊन राज्यातील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने ही अधिवेशनास येणाऱ्या पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे..…

Read More

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रेशनकार्डधारकांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप

पिंपरी, दि. २५ ( प्रगत भारत । pragatbharat.com)– राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रेशनकार्डधारकांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते शिधा किटचे वाटप करण्यात आले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ठिकठिकाणच्या रेशन धान्य दुकानांवर भाजपचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिधा वाटप कार्यक्रम पार पडले.राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने दिवाळीसाठी नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे. यात रेशनिंग दुकानातून १०० रुपयांत रवा, साखर, गोडतेल, चणाडाळ या चार वस्तू आनंदाचा शिधा म्हणून दिले जात आहे. हा शिधा ऑफलाइन…

Read More

नाशिकमध्ये खासगी बसला आग लागून १३ जणांचा मृत्यू

नाशिक : औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा १३ वर गेला आहे. अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर बसने पेट घेतला. गाढ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश:…

Read More

पीसीसीओई मध्ये “नो जपान” कार्यक्रमाचे आयोजन : डॉ. गोविंद कुलकर्णी

पिंपरी (pragatbharat) :- जपान मधील शिक्षण, संशोधन, रोजगार संधी जाणून घेण्यासाठी पीसीसीओई मध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे दोन दिवसीय “Know Japan” या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शुक्रवारी व शनिवारी (दि.१४ आणि १५ ऑक्टोबर) सकाळी ९ वा. उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम पीसीईटी, इंडो जपान बिझनेस कौंसिल, जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन च्या सहकार्याने शिक्षण व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी मोफत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जपानचे मुंबईतील वाणिज्य दूतावास प्रमुख सल्लागार डॉ. फुकाहोरी यासुकाता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य…

Read More

पिंपरी चिंचवड व पुणे महानगरातील मुळ मराठवाडा येथील रहिवाशी बंधु भगिनींचा मराठवाडा दसरा स्नेह मेळावा संपन्न

पिंपरी (प्रगत भारत): मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर पिंपरी चिंचवड पुणे महानगरातील मुळ मराठवाडा येथील रहिवाशी बंधु भगिनींचा भव्यदिव्य मराठवाडा दसरा स्नेह मेळावा बुधवार दि ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पिरॅमिड हॉल शाहुनगर येथे आनंदच्या व उत्सवाच्या वातावरणात पार पडला.  भेटीगाठी आपली माती आपली माणसं या भुमिकेतुन  सर्वजण एकत्र जमली होती. मराठवाडा दसरा मेळाव्याच वेगळेपण म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवात स्त्री शक्ती गौरव केला जातो म्हणुन मेळाव्याच उद्घाटन महिलांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन अमर जवान स्मारक प्रतिकृतीला मानवंदना देऊन करण्यात आले.  मराठवाडा भुमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर जिल्हा…

Read More

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या बालकांना सोन्याची अंगठी

चेन्नई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय तामिळनाडू भाजपाने घेतला आहे. त्यासाठी आम्ही चेन्नईतील काही सरकारी रुग्णालये निवडली आहेत. तेथे पंतप्रधानांच्या जन्मदिनी जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठ्यात दिल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मत्स्य पालन, सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी दिली. याशिवाय अन्य योजना अंतर्गत ७२० किलो मासे मोफत वाटले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी वाटण्यासाठी येणारा खर्च कोण करणार, असा सवाल पत्रकारांनी विचारला तेव्हा त्याला उत्तर देण्याचे मुरुगन यांनी टाळले.…

Read More

भोसरी महोत्सवात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : ॲड. नितीन लांडगे अशोक सराफ, निर्मिती सावंत यांची उपस्थिती व सादरीकरण

पिंपरी, पुणे ( दि. २९ ऑगस्ट २०२२) भोसरी कला, क्रीडा रंगमंच च्या वतीने गुरुवार पासून ( दि. १ सप्टेंबर) सोमवार (दि.५ सप्टेंबर) पर्यंत “भोसरी महोत्सव २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजता आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती  भोसरी कला, क्रीडा मंचचे अध्यक्ष व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.      भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भूषवणार आहेत. तर माजी खासदार…

Read More

शहरातील एन ए प्लॉटसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती…

पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- शहरातील रहिवास क्षेत्रातील जमिनी पुन्हा एनए करावे लागते. या जमिनी एनए करताना कराव्या लागणाऱ्या अनेक महिने किंवा वर्ष जातात. परिणामी राज्यातील शहरांमधील किमान रहिवास क्षेत्रातील जागांना पुन्हा एनए करण्याची गरज लागू नये, असा निर्णय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात दिली.नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,…

Read More

पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न – आयुक्त शेखर सिंह

(Pragatbharat.com) पिंपरी, दि. १८ ऑगस्ट २०२२ :-  नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संरचनात्मक आखणी करून शहराच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी भर दिला जाणार असून वेगाने वाढणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आज शेखर सिंह यांनी  स्विकारला. त्यांनतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पदभार स्विकारण्याची प्रक्रिया  पार पडली. त्यानंतर  अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांनी नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. २०१२ च्या…

Read More

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

(pragatbharat.com) शिरुर, 11 ऑगस्ट : शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचं निधन झालं आहे. शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार सुरू होते. बाबुराव पाचर्णे यांच्यावर मागील काही दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कँन्सर सारख्या गंभीर आजाराने पाचर्णे यांना ग्रासले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं. शेतकरी कुटुंबात जन्मलेले पाचर्णे यांची अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1978 मध्ये ते शिरूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य झाले. त्यानंतर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवला. त्यानंतर सलग आठ वर्ष ते बाजार समितीमध्ये सभापती राहिले होते. 1993 मध्ये ते…

Read More