भाजपला झुकते माप ; खातेवाटपात गृह, अर्थ, महसूलसह महत्त्वाचे विभाग 

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाल़े  गृह, अर्थ, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार, उर्जा, गृहनिर्माण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपने स्वत:कडे ठेवून सरकारमध्ये आपले वर्चस्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते कायम ठेवले असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे कायम ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपच्या वाटय़ाला गेली आहेत. शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक…

Read More

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जल्लोष

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अवघ्या मुंबापुरीत रविवारी सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण होते. सुट्टीचा दिवस असल्यामुळे  नागरिक नरिमन पॉइंट येथील समुद्रकिनाऱ्यावर जमण्यास सुरुवात केली. अनेक विद्यार्थी राष्ट्रध्वज फडकवत, समुद्रकिनाऱ्यांवर एकत्र आल्याने उत्साहाला जणू उधाण आले  होते. संध्याकाळनंतर हा उत्साह अधिक ओसंडून वाहत होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची घोषणा केल्यानंतर मुंबई महापालिकेने तब्बल ४१ लाख राष्ट्रध्वजांचे मोफत वितरण केले होते. शहरातील अनेक शासकीय इमारती तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. त्याचबरोबर मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यालगतच्या इमारतींसह गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, महापालिका मुख्यालय, रेल्वे मुख्यालय…

Read More

Independence Day 2022 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2022 : आज 15 ऑगस्ट. अर्थात आपला स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). 15 ऑगस्ट 1947 रोजी याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपला भारत 75 व्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत. 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनामागचा इतिहास नेमका काय आहे हे या माध्यमातून जाणून घेऊयात.  स्वातंत्र्यदिनाचा इतिहास (Independence Day 2022…

Read More

सलग सातव्या रविवारी आरेमध्ये कारशेडविरोधात आंदोलन

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : आरे वसाहतीमध्ये होऊ घातलेल्या कारशेडला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सलग सातव्या रविवारी आंदोलन केले. पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रध्वज फडकवत आरे कारशेडविरोधात घोषणाबाजी केली. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी आरे वसाहतीत बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ साठी आरे वसाहतीमध्ये उभारण्यात येणारी कारशेड अन्यत्र हलविण्याच्या मागणीसाठी  सात रविवारपासून येथे पर्यावरणप्रेमी आंदोलन करीत आहेत. आरेमधील कारशेड आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यात येत आहे. तेथील पशुपक्ष्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असा दावा आहे.

Read More

Parsi New Year 2022 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pateti 2022 : पतेती (Pateti 2022) हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार (Zoroastrian Calendar) वर्षाचा शेवटचा दिवस हा ‘पतेती’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी पारशी बांधव अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी ‘पतेती’ सण आहे. तर 16 ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरं केलं जाणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ (Nowruz) म्हणून देखील ओळखला जातो.  पतेती उत्सवाची सुरुवात…

Read More

पी डिमेलो मार्ग-गिरगाव चौपाटी पाच मिनिटांत ; भूमिगत मार्गाच्या उभारणीसाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती 

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना पी डिमेलो मार्गावरून मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी येथे पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र लवकरच हा प्रवास वेगवान  होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यासाठी पुढाकार घेतला असून पी. डीमेलो मार्ग ते गिरगाव चौपाटी दरम्यान साडेतीन किमी लांबीचा भूमिगत मार्ग तयार निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून बृहत् आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी निविदा मागविण्यात आल्या. या प्रकल्पामुळे पी डिमेलो मार्ग ते गिरगाव चौपाटी अंतर केवळ…

Read More

meeting soon to clear misunderstandings about refinery says industries minister uday samant zws 70

( प्रगत भारत । pragatbharat.com) रत्नागिरी :   रिफायनरीबाबत काही गैरसमज झाले असतील तर ते आधी दूर केले जातील. त्यासाठी लवकरच माझ्या दालनात बैठक घेतली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खेड येथे पत्रकारांशी बोलताना नमूद केले.    शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सामंत यांचे रविवारी दुपारी जिल्ह्यात आगमन झाले. या दौऱ्यात असतानाच त्यांना उद्योगमंत्रीपद मिळाल्याचे वृत्त आले. या पार्श्वभूमीवर सामंत म्हणाले की, कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकल्प आणून बेरोजगारी दूर करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. आज जो काही महाराष्ट्र पाचव्या- सहाव्या क्रमांकावर आहे, त्याला…

Read More

विनायक मेटे यांचे अपघाती निधन ; मराठा समाजाचा आवाज उंचावणारा नेता हरपला; आज अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला. ते ५२ वर्षांचे होते. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात  आयोजित केलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार होते.  पहाटे पाचच्या सुमारास  भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला.  त्यांना तातडीने उपचार मिळू  शकले नाहीत, असा आरोप त्यांच्या वाहन चालकाने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी स्थानिक पातळीवरचा पाच दिवसांचा नियोजित दौरा सोडून मध्यरात्रीच मेटे मुंबईकडे निघाले होते. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायक मेटे यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा…

Read More

आज पावसाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात गेल्या आठवडय़ापासून मोसमी पाऊस सक्रिय असून, रविवारीही काही भागांत सरी कोसळल्या. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. दुसरीकडे गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे समुद्रातून भूभागाकडे बाष्प येत आहे. त्यातून राज्यातील काही भागांत अद्यापही पाऊस सक्रिय आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसर, रत्नागिरी, पुणे, महाबळेश्वर, नाशिक आदी भागांत हलक्या पावसाची नोंद झाली.…

Read More