‘रुपी’ बँकेला उद्यापासून टाळे ; न्यायालय, केंद्राकडून दिलासा नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : नियमांचे उल्लंघन आणि आर्थिक अनियमिततांमुळे तोटय़ात गेलेल्या रुपी सहकारी बँकेला वाचविण्याचे न्यायालयीन आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सर्व प्रयत्न असफल ठरले. त्यामुळे उद्या या बँकेला कायमचे टाळे लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. शतकभराचा वारसा लाभलेल्या, १९१२ मध्ये स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील या जुन्या अशा रुपी बँकेवर गेली काही वर्षे प्रशासकीय राजवट आहे. आजमितीस ‘रुपी’कडे ८३० कोटी रुपयांची रोखता, ८० कोटी रुपयांची मालमत्ता असून, सुमारे १०० कोटी रुपयांची कर्जवसुली बाकी आहे. सुधारित ठेव विमा संरक्षण कायदा २०२१ च्या तरतुदींनुसार ठेव विमा महामंडळाने ६४,०२४ ठेवीदारांच्या…

Read More

अकोला जिल्ह्यात ‘लम्पी’चा उद्रेक; ४६ जनावरे मृत्युमुखी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अकोला : जिल्ह्यात गोवंशीय व म्हैसवर्गीय जनावरांमधील ‘लम्पी’ या त्वचारोगाचा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल १४७६ जनावरे बाधित झाली असून त्यापैकी ४६ जनावरे दगावली आहेत. या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी अबाधित जनावरांना देण्यात येणाऱ्या लसीच्या दोन लाख ८८ हजार मात्रा जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या. आतापर्यंत ८७ हजार ५८४ जनावरांना लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांचे लसीकरण वेगात करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. ‘लम्पी’ त्वचारोग या प्राण्यांमधील आजाराचा जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीला विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी,…

Read More

दर्जाचा आग्रह धरणे स्वागतार्ह! ; पुरुषोत्तम करंडकच्या निकालाबाबत ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़समीक्षक माधव वझे यांची परखड भूमिका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : सर्वच क्षेत्रांत सवंगपणा येत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे परीक्षक दर्जाचा आग्रह धरत असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटय़समीक्षक माधव वझे यांनी मांडली. महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे घेण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील ‘पुरुषोत्तम करंडक’ माधव वझे यांचे वडील पुरुषोत्तम रामचंद्र वझे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. नुकत्याच झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या निकालात पात्रतेअभावी पहिला क्रमांक विजेत्या संघाला पुरुषोत्तम करंडक न देण्याचा, वैयक्तिक पारितोषिकांचा करंडक न देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच झाला. या निर्णयावरून नाटय़क्षेत्रात…

Read More

नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान ; साडेतीन कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प

( प्रगत भारत । pragatbharat.com) संदीप आचार्य, लोकसत्ता मुंबई : :नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यातील महिलांच्या सर्वागिण आरोग्य तपासणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या संकल्पनेअंतर्गत या काळात १८ वर्षांवरील साडेतीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्यदृष्टय़ा सशक्त असेल तर घर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून आरोग्य विभागाबरोबरच महापालिका, आदिवासी तसेच महिला व बाल विकास विभागाची मदत घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांच्या मुख्य…

Read More

चेतना सिन्हा यांचा अमेरिकेत बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मान 

( प्रगत भारत । pragatbharat.com) वाई: येथील माण देशी महिला बँक व माण देशी फौंडेशनच्या माध्यमाने  ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्यास दिलेल्या योगदानाची दखल घेऊन श्रीमती चेतना सिन्हा यांना अमेरिकेतील ‘क्लिंटन ग्लोबल इनिशियेटिव्ह’ कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.  जागतिकहवामान बदलाचे परिणाम आज ग्रामीण भागामध्ये विशेषत: शेती व्यवसायावर जाणवत आहेत. यापुढे या समस्येवर काम करण्याचा मानस ‘क्लिंटन ग्लोबल  इनिशियेटिव्ह’ या कार्यक्रमात श्रीमती सिन्हा यांनी व्यक्त केला. भारतातील माण देशामधील ग्रामीण भागातील हवामानातील बदल व त्याचा पिकांवर…

Read More

chandrakant patil chairman of the maratha reservation sub committee zws 70

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यावर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करून टीकेची झोड उठविणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. मराठा समाजाला दिलासा मिळवून देण्याची जबाबदारी आता पाटील यांच्या खांद्यावर आली आहे.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करण्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्याने मराठा समाजाला मोठा धक्का बसला होता.…

Read More

राजकीय आंदोलनातील खटल्यांमधून खासदार – आमदारांची सुटका नाही ; इतर आंदोलकांवरील खटले मागे घेणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : राज्यात विविध प्रश्नांवर झालेल्या राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. परंतु अशा आंदोलनातील खटल्यातून आजी-माजी खासदार व आमदार यांची सहजासहजी सुटका केली जाणार नाही. उच्च न्यायालयाच्या संमतीनंतरच खासदार व आमदारांवरील खटले मागे घेतले जाणार आहेत. इतर आंदोलकांवरील खटले मागे घेण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांकडून सार्वजनिक हिताच्या व वेगवेगळय़ा प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे इत्यादी स्वरूपाची आंदोलने केली जातात. अशा आंदोलनात कायद्याचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांकडून…

Read More

‘बारामती मोहिमे’साठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पुण्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी (२१ सप्टेंबर) पुण्यात येणार आहेत. मिशन बारामती मोहिमेला प्रत्यक्ष गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. अमेठी मतदारसंघ जिंकला, आता बारामतीही जिंकणार, असा विश्वास या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्यावरून…

Read More

काँग्रेसतर्फे देशात प्रत्येक जिल्ह्यात संविधान बचाव सभा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय संविधान मोडित काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु काँग्रेस ते होऊ देणार नाही, काँग्रेस संविधान रक्षकाची भूमिका पार पाडेल, त्याचाच एक भाग म्हणून आगामी काळात देशातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान सभा घेण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठिया यांनी मंगळवारी टिळक भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजप व संघावर जोरदार टीका केली. या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या आधी झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी…

Read More

पैशांच्या तगाद्यामुळे अधिकाऱ्याची आत्महत्या ; चौघे अटकेत 

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे :  व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने  सहकार खात्यातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी चौघांना अटक केली असून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शंकर शिंदे (वय ५२, रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव नाहे. शिंदे सहकार खात्यात अधिकारी आहेत. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात विजय सोनी यांचे वडील, पंधरकर, शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा…

Read More