changes in system due to pm narendra modi s decisions says fm nirmala sitharaman zws 70

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळेच देशाचे स्वरूप बदलत आहे. मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळेच व्यवस्थेचे परिवर्तन झाले आहे. संस्कृतीची जोपासना, विविध सेवा प्रणालींचे आधुनिकीकरण, मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या विकासकामांतून मोदींनी देशात केलेले परिवर्तन स्पष्ट झाले आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे बुधवारी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे’ या विषयावर डॉ. निर्मला सीतारामन यांचे व्याख्यान बुधवारी आयोजित करण्यात आले होते.   संस्कृतीची जोपासना, विविध सेवांचे आधुनिकीकरण मोदींनी केले आहे.…

Read More

अभिनेता महेश ठाकूर यांची साडेपाच कोटींची फसवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : अभिनेता महेश ठाकूर यांना त्यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत खोटी माहिती देऊन साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून आरोपी मयांक गोयल हा ठाकूर यांच्या संपर्कात होता. त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच ठाकूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाप्रकरणी उच्च व सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्याचे त्यांना खोटे सांगितले. त्यानंतर   मालमत्तेसंदर्भात शासकीय कार्यालयात, खासगी कार्यालयात पुरावे गोळा करण्यासाठी पैसे खर्च झाले, असे भासवून ठाकूर यांच्या ओळखीच्या इतर लोकांच्या बँक खात्यात ऑनलाइन…

Read More

खड्डय़ांमुळे २४ तासांत सहा जणांचा मृत्यू ; मुंबई-अहमदाबाद  महामार्ग दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरुद्ध गुन्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील आमगाव फाटय़ाजवळ खड्डय़ांमुळे अवघ्या २४ तासांत एकाच ठिकाणी दोन वेगवेगळय़ा अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आमगाव येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री मोटार आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. तर, मंगळवारी दुपारी अन्य एक मोटार आणि टेम्पोमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला.  या प्रकरणी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखरेख, दुरुस्ती करणारी कंत्राटदार…

Read More