परीक्षा, निकालाचा ८१ टक्के विद्यार्थ्यांना ताण ; ‘एनसीईआरटी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे : देशभरातील ८१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अस्वस्थेतेचे कारण अभ्यास, परीक्षा आणि निकाल असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ५१ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकण्यात अडचणी आल्या, तर जवळपास ४५ टक्के विद्यार्थी आपल्या शारिरिक स्थितीबाबत  समाधानी नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ‘एनसीईआरटी’च्या मनोदर्पण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. त्यानुसार देशभरातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सहावी ते बारावीच्या ३ लाख ७९ हजार विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्याशी संबंधित असलेला दृष्टिकोन समजून घेण्यासाठी हे…

Read More

खड्डय़ांवरून खरडपट्टी ; कोलकात्याच्या तुलनेत मुंबईतील रस्ते दयनीय : उच्च न्यायालय 

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : मुंबईतील रस्ते हे कोलकात्यातील रस्त्यांपेक्षा चांगले असल्याची टिप्पणी दोन वर्षांपूर्वी केली होती. आता दोन वर्षांत परिस्थिती बदलली असून मुंबईतील रस्ते कोलकात्यातील रस्त्यांपेक्षा अधिक दयनीय असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागत असल्याचे मत उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. मुंबई महापालिका ही काही राज्यांपेक्षाही आर्थिकदृष्टय़ा समृद्ध आहे. अशा या समृद्ध महापालिकेने तिच्याकडील पैसा सार्वजनिक हित आणि नागरिकांच्या चांगल्यासाठी खर्च करावा, असेही न्यायालयाने सुनावले. एवढेच नव्हे, तर मुंबईतील २० दयनीय रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवाल महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि सार्वजनिक विभागाचे अतिरिक्त सचिव यांनी स्वत: न्यायालयात हजर…

Read More

सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक

( प्रगत भारत । pragatbharat.com) सांगली : नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा  लेखक पद्यश्री सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा गुरुवारी सांगलीत केली. आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाटय़क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस हे गौरवपदक देण्यात येते. करोनामुळे दोन वर्षे पदक…

Read More