‘सम्राज्ञी’ माहितीपटात लता मंगेशकर यांचा जीवन प्रवास 

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी २८ सप्टेंबरला त्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या माहितीपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. भारतीय संगीत क्षेत्रातील अलौकिक, अद्वितीय सूर म्हणून नावाजलेल्या लतादीदींचा जीवनप्रवास कसा होता हे पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. ‘सम्राज्ञी’ या नावाने येत असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन संगीतकार मयुरेश पै करणार आहेत.  लतादीदींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एन्टरटेन्मेट व लतिका क्रिएशन्स यांनी ‘सम्राज्ञी’ या माहितीपटाच्या निर्मितीची घोषणा केली आहे. ‘लता मंगेशकर या भारतीय संगीताच्या ज्ञानेश्वरी आहेत, या ज्ञानेश्वरीच्या निर्मळ पारायणाचा हा प्रयत्न आहे’,…

Read More

मुंबई, पुणे, संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरू निवड समिती स्थापन

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या स्थापन केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन व गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे या निवड समितीचे सदस्य असतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती…

Read More

crowd Shinde group Dussehra gathering preparations begin ysh 95

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : शिवसेनेतील खासदार, आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे.  दोन्ही मेळाव्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर कोणत्या मेळाव्याला अधिक गर्दी होणार याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’च्या मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दीड ते दोन लाख समर्थक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे याकरिता दोन्ही गटांनी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. महापालिकेने कोणताच निर्णय न घेतल्याने शिवसेनेने…

Read More

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास उद्यापासून महाग; पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी ९३ रुपये भाडे 

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ शनिवार, १ ऑक्टोबरपासून लागू होत आहे. नव्या भाडेदर पत्रकानुसार रिक्षातून दिवसा पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी ७७ रुपये, तर टॅक्सीसाठी ९३ रुपये द्यावे लागणार आहेत. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यासाठी संपाचा इशाराही दिला होता. अखेर परिवहन विभागाने भाडेवाढीस मंजुरी दिली. रिक्षाच्या भाडय़ात पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये, टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचे भाडे १ ऑक्टोबरपासून २१ रुपयांवरून २३ रुपये,  टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये होणार आहे. रिक्षातून रात्री १२ नंतर दीड किलोमीटर…

Read More

मेधा सोमय्या तक्रारप्रकरण : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नोव्हेंबरपासून खटला?

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर १ नोव्हेंबरपासून खटला चालवण्यात येण्याची शक्यता आहे. मेधा यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत, असे राऊत यांनी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी १ नोव्हेंबरपासून राऊत यांच्या विरोधातील खटला सुरू करण्याचे संकेत महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी दिले.

Read More

22500 rupees bonus municipal employees Chief Minister Eknath Shinde announcement Nine thousand health workers ysh 95

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : मुंबई महापालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. तसेच आरोग्य सेविकांना एक पगार म्हणजेच नऊ हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत कामगार संघटनांची गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत यावेळी चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे ९३ हजार आणि बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका…

Read More

विकासकाला परस्पर विकलेला माझगावमधील एक एकर भूखंड शासकीय?; जल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी प्रलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : माझगावमधील मोक्याच्या ठिकाणी असलेला सुमारे एक एकर भूखंड एका ट्रस्टने विकासकाला परस्पर विकला असला तरी तो शासकीय भूखंड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी प्रलंबित असून ती लांबविली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या एक एकरपैकी पाऊण एकर भूखंड जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असला तरी उर्वरित भूखंडही शासकीय असल्याने तोसुद्धा ताब्यात घेण्यात यावा, असे या तक्रारदाराचे म्हणणे आहे. माझगाव येथील भूखंड ‘कच्छी लोहाणा निवास गृह ट्रस्ट’ला एक भूखंड ९० वर्षांच्या भुईभाडय़ाने देण्यात आला होता. २००२ मध्ये भुईभाडय़ाची मुदत संपल्यानंतरही कराराचे नूतनीकरण…

Read More

मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर येथे गाडीला हिरवा कंदिल

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली  वातानुकूलित ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल-गांधीनगर-मुंबई सेन्ट्रल दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकात उद्या, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता या गाडीला हिरवा कंदिल दाखवणार आहेत. ही एक्सप्रेस १ ऑक्टोबरपासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. सहा तास २० मिनिटांत मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर कॅपिटल स्थानक प्रवास पूर्ण होणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या एक्सप्रेसमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोटॉयलेट अशा विविध सुविधा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

Read More

वेशभूषाकार नचिकेत बर्वे यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; दिल्लीतील सोहळय़ात आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : प्रसिध्द वेशभूषाकार नचिकेत बर्वे यांना ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी, ३० सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. बर्वे यांनी २००७ साली स्वत:चे ‘फॅशन लेबल’ सुरू केले. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अनुष्का शर्मा, क्रिती सनन आदी नामवंत कलाकार त्यांच्या ‘कलेक्शन’चे ग्राहक आहेत. कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटांसाठी त्यांना राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…

Read More

नामफलक मराठीत नसल्यास आता कारवाई?; दुकानांवरील पाटय़ांबाबत अंमलबजावणीचा आज शेवटचा दिवस

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : दुकानांचे नामफलक मराठीत लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी असलेली मुदत शुक्रवारी संपत असून अद्यापही नामफलकात बदल न करणाऱ्या दुकानांवरील कारवाईबाबत अनिश्चितता आहे. आयुक्तांच्या होकारानंतर किंवा याबाबत सरकारच्या नव्या निर्णयानंतर दुकानांवरील मराठी पाटय़ांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.  राज्य सरकारने मार्च महिन्यात सर्व दुकाने, आस्थापनांवर ठळक शब्दांत मराठी फलक लावणे बंधनकारक केले. मात्र मुंबईत पालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ठळक अक्षरांत मराठी फलक न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने आराखडा तयार केला आहे. आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतरच कारवाई केली जाईल,…

Read More