मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी केले. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर जारी झालेल्या शासन निर्णयाची चौकशी करण्याची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची पत्रकार परिषदेतून माहिती दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही आमदारांच्या निधी वाटपासह प्रशासकीय प्रकल्पांना मान्यता, बदल्या, नियुक्त्यांचे शासन निर्णय जारी केले. यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याकडे माध्यमांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर…
Read More