Video : जम्मू काश्मीरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी; आभाळातून जणू बरसला कापूस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu Kashmir receives season`s first snowfall : इथं भारतातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झालेला असतानाच तिथं देशाच्या उत्तरेकडे मात्र आता थंडीची चाहूल लागताना दिसत आहे. उत्तराखंडपासून राजस्थानपर्यंत आता मान्सूननं परतीची वाट धरण्यास सुरुवात केलेली असतानाच अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये मात्र चित्र काहीसं वेगळं असल्याची बाब समोर आली आहे. कारण, इथं हिवाळ्याची चाहूल लागली असून, मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे.  आभाळातून भुरभुरणारा कापूर खाली पडावा तसा बर्फ जम्मू काश्मीरच्या पर्वतीय भागांमध्ये पडला आणि इथं स्थानिकांसोबतच भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांनी आनंद व्यक्त केला.  Morning visuals of Fresh…

Read More

Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) सीमाभागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच राहतात. या कुरापतींना हाणून पाडण्यासाठी लष्कराकडूनही तोडीस तोड प्रयत्न केले जात आहेत. पण, सध्या मात्र इथं तणावाच्या वातावरणात आणखी भर पडताना दिसत आहे. कारण, जवळपास दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे सुरु असणारं एनकाऊंटर तिसऱ्या दिवशीही सुरुच असल्याचं कळत आहे.  कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष धौंचक आणि डीएसपी मुजम्मिल हुमायूं भट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या द रजिस्टेंस फ्रंट संघटेनेच्या कमांडर उजैर आणि गाजी उस्मान या दोन्ही दहशतवाद्यांना अनंतनागच्या गडोल येथील वनपरिसरात संरक्षण यंत्रणांनी घेरलं आहे.…

Read More

जम्मू काश्मीरमधून बेपत्ता झालेला ‘तो’ जवान अखेर सापडला, 5 दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम (Kulgam) येथून बेपत्ता झालेला जवान अखेर सापडला आहे. रायफलमन जावेद अहमद वानी (Javaid Ahmad Wani) हा शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. यानंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. अखेर जावेद अहमद वानीचा शोध लागला असून, जम्मू काश्मीर पोलिसांनीच ही माहिती दिली आहे.  25 वर्षीय बेपत्ता लष्कर जवानाचा शोध लागल्याची माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं आहे की, “कुलगाम पोलिसांना लष्कर जवान सापडला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याची संयुक्त चौकशी केली जाईल”. दरम्यान पोलिसांनी अतिरिक्त माहिती दिलेली नाही. अधिक माहिती…

Read More