अमेरिकेच्या हस्तक्षेपानं चीनला मिरच्या झोंबल्या! तैवानच्या किनारपट्टीवर हवाई हल्ले

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : चीन आणि तैवानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची चिन्ह आहेत. चीननं युद्धाभ्यासादरम्यान तैवानवर हवाई हल्ले केले आहेत. चीनचं समुद्रात युद्धाभ्यास वाढवला आहे. त्यामुळे आधीच तणाव निर्माण झाला. आता चीननं या अभ्यासादरम्यान थेट तैवानच्या किनारपट्टीवर मिसाईल डागले आहेत. यामुळे तिथली परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यामुळे चीनच्या संतापाचा उद्रेक झाला होता. पेलोसी तैवानमधून गेल्यानंतर आता चीननं अधिकच आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चीन आणि तैवानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  युद्धाभ्यासाच्या नावाखाली चीननं…

Read More