Kidney Failure Symptoms And Causes | मूत्रपिंड निकामी होण्यामागील ही असू शकतात कारणे, दुर्लक्ष करू नका | Maharashtra Times

( प्रगत भारत । pragatbharat.com) – डॉ. अभय सदरे, मूत्रविकारतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक जेव्हा मूत्रपिंडे अचानक रक्तामधून नको असलेले घटक बाहेर काढण्यास असमर्थ ठरू लागतात, तेव्हा या घटकांची पातळी त्रासदायक होते आणि रक्तातील रसायनांच्या रचनेत समतोल राहत नाही. ‘अक्युट किडनी फेल्युअर’ याला ‘अ‍क्युट रिनल फेल्युअर’ किंवा ‘अक्युट किडनी इन्ज्युरी’ असे म्हणतात. ही अवस्था वेगाने विकसित होते. सामान्यत: अगदी काही दिवसांतच. जे रुग्ण गंभीर आजारी असतात आणि अतिदक्षता विभागात दाखल असतात, अशांमध्ये मूत्रपिंडे निकामी होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. ‘अक्युट किडनी फेल्युअर’मुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शरीराच्या इतर अवयवांचे कार्य…

Read More