IAS अधिकाऱ्यांचा बॉस कोण असतो? ते कोणाला रिपोर्ट करतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC Result 2024: युपीएससीच्या निकालांची घोषणा होताच अनेक उमेदवारांचं सरकारी सेवेत दाखल होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आयएएस, आयपीएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र मेहनत करणाऱ्या अनेकांची आज स्वप्नपूर्ती झाली आहे. आयएएस हे पद आपल्या देशात फार प्रतिष्ठित मानलं जातं. या पदाला एक वेगळा मान, सन्मान आहे. त्यामुळेच देशसेवा करण्याच्या उद्देशाने ही खडतर परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कित्येक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. या परीक्षेशी फक्त उमेदवार नाही तर संपूर्ण कुटुंब भावनात्मकपणे जोडलेलं असतं.  देशातील कित्येक तरुण-तरुणी युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या तरुणपातील मोठा काळ खर्ची घालतात.…

Read More

सर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS officers misused funds : सहसा सनदी अधिकाऱ्यांचा आदर्श युवा पिढी ठेवत असते. किंबहुना सनदी अधिकाऱ्यांना समाजाकडूनही त्यांच्या या पदामुळं कमालीचा मान मिळतो. इतकंच नव्हे, तर देशात आणि देशाबाहेरही या अधिकाऱ्यांना शासनातर्फे अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण, सध्या मात्र देशातील तीन सनदी अधिकारी खळबळजनक गौप्यस्फोटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  2015 मध्ये पॅरिस दौऱ्यादरम्यान या सनदी अधिकाऱ्यांनी एकदोन नव्हे करदात्यांच्या तब्बल 6.72 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा दावा चंदीगढचे ऑडिट महासंचालक (मध्य) कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विजय कुमार देव (चंदीगढचे तत्कालीन प्रशासकीय सल्लागार), विक्रम देव दत्त…

Read More

'मी स्वर्गात मजा मारतोय,' हत्येच्या आरोपीने थेट जेलमधून केलं Live; अधिकाऱ्यांची एकच धावपळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात हत्येच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये असलेल्या आरोपीने थेट सोशल मीडियावरुन लाईव्ह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी त्याने लोकांशी संवाद साधला. तसंच आपण स्वर्गात मजा करत असल्याचं म्हटलं.   

Read More

Manipur Violence: 200 जणांनी घरात घुसून केलं पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण, लष्कराला पाचारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Violence: मणिपूरमध्ये तणाव वाढला असून लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. याचं कारण मेईती संघटना अरामबाई तेंगगोलच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण केलं.  इम्फाळ पूर्व जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षकांचे अपहरण करण्यात आलं. मणिपूर पोलिसांनी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, इंफाळ पूर्वेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित सिंग यांची नंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जलद कारवाई करत सुटका केली. अमित सिंग हे मणिपूर पोलीस दलात ऑपरेशन्स विंगमध्ये तैनात होते. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करणयात आलं असून, प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी जवळपास अरामबाई तेंगगोलशी संबंधित 200…

Read More

शाहरुखमुळे कतारकडून नौदल अधिकाऱ्यांची सुटका; स्वामींच्या खळबजनक दाव्यावर अभिनेता झाला व्यक्त, म्हणाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) कतारच्या जेलमध्ये अडकलेल्या 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. कतारच्या कोर्टाने हेरगिरी प्रकरणी या अधिकाऱ्यांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्याचं जन्मठेपेत रुपांत करण्यात आलं होतं. दरम्यान कतारने सुटका केल्यानंतर 7 अधिकारी मायदेशी परतले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत. नरेंद्र मोदींच्या मध्यस्थीशिवाय आमची सुटका शक्य नव्हती अशी भावना या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पण यादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रहमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी खळबळजनक दावा केला आहे. शाहरुख खानने (Shahrukh Khan) केलेल्या मध्यस्थीमुळे कतारने (Qatar) 8…

Read More

‘त्याचा कचरा करू नकोस’; अगस्त्य नंदाला लष्करी अधिकाऱ्याचा कडक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Agastya Nanda : ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. अगस्त्य हा श्रीराम राघवन यांच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची तयारी करत असताना काय झालं याविषयीचा एक धक्कादायक किस्सा अगस्त्यनं सांगितला आहे. त्यावेळी एका लष्करी अधिकाऱ्यानं इशारा दिला होता. त्यानंतर अगस्त्यनं लगेच त्याच्या आईला म्हणजेच श्वेता बच्चनला कॉल केला होता. याचा खुलासा स्वत: अगस्त्यनं एका मुलाखतीती केला आहे.  अगस्त्य नंदाचा ‘इक्कीस’ हा आगामी चित्रपट 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. तर हा…

Read More

नमाज अदा करत असतानाच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या; बारामुल्लात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Terrorist Attack In Baramulla : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) बारामुल्लामध्ये (Baramulla Terror Attack) दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे.  बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी सकाळी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बारामुल्लाच्या शेरी येथील गंटमुल्ला येथे दहशतवाद्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी हे गंटमुल्ला भागातील मशिदीत नमाज अदा करत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यात आली…

Read More

वाळू माफियांना पकडायला गेलेल्या अधिकाऱ्याची चिरडून हत्या; रात्रभर नदीत पडून होता मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याची वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Read More

अंबानींची गुंतवणूक असूनही बंद होण्याच्या मार्गावर ‘ही’ कंपनी; अधिकाऱ्यांची राजीनाम्यासाठी रांग, पगारही अडकले

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुकेश अंबानीच्या नेतृत्तावील रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठिंबा दिलेल्या डंजो कंपनीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. डंजो कंपनीत रिलायन्स रिटेलची 25.8 टक्के भागीदारी आहे.   

Read More

‘फ्लाइंग किस’वर महिला IAS अधिकाऱ्याचं सडेतोड ट्वीट; खासदारांना म्हणाल्या ‘मणिपूरच्या महिलांना काय वाटलं असेल?’

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन केंद्रावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपलं भाषण संपल्यानंतर ‘फ्लाइंग किस’ दिल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपाने या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांना घेरलं असून, महिला खासदारांनी राहुल गांधींविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रच लिहिलं आहे. यादरम्यान एका महिला आयएएस अधिकाऱ्याने या वादावर भाष्य केलं आहे.  राहुल गांधींनी वर्तन अशोभनीय असल्याचं सांगत भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सोपवलं…

Read More